

Food Poisoning Case in Karjat Taluka; Health Officials Rush to Hospital
sakal
कर्जत : पाटेवाडी (ता. कर्जत) येथे वडापाव खाल्ल्याने पंधरा जणांना विषबाधा झालेली आहे. या सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. त्यापैकी चौघांना माहिजळगाव येथील दोन खासगी रुग्णालयांत चौघांवर, तर उर्वरित सात जणांवर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, तालुका आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी भेट देत रुग्णांची विचारपूस केली.