तिसरी लाट रोखण्यासाठी टास्क फोर्स, यंत्रणा अलर्ट

Kopargaon MLA Ashutosh Kale
Kopargaon MLA Ashutosh Kale ई सकाळ

कोपरगाव ः कोविड बरा झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळतात. त्यावरील उपचार व्यवस्था व कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी करण्यात आली आहे. त्यासाठी तालुका पातळीवर "टास्क फोर्स' नियुक्त करण्यात आल्याची माहिती आमदार आशुतोष काळे (Kopargaon MLA Ashutosh Kale) यांनी दिली.

या संदर्भात घेतलेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. बैठकीस तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, संदीप रोहमारे, डॉ. अजय गर्जे, डॉ. आतिष काळे, डॉ. दीपक पगारे, डॉ. शंतनू सरवार, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. अमोल अजमेरे, डॉ. अंजली फडके, डॉ. कुणाल कोठारी, डॉ. हेमंत राठी, डॉ. अस्मिता लाडे, डॉ. मयूर जोर्वेकर, डॉ. संतोष तिरमखे, डॉ. वरद गर्जे, डॉ. प्रियांका मुळे आदी उपस्थित होते. (Health system alerts to prevent third wave of corona)

Kopargaon MLA Ashutosh Kale
वाडीतली पोरं सगळ्यात म्होरं ः १६ फौजदार, १४ क्लासवन अधिकारी

काळे म्हणाले, ""कोविडच्या तिसऱ्या संभाव्य लाटेबाबतच्या उपाययोजना केल्या आहेत. त्याबाबत आरोग्य विभाग व सरकारी यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. म्युकरमायकोसिस या आजारासाठी कोपरगाव तालुका टास्क फोर्स समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष डॉ. कुणाल कोठारी असून, डॉ. अस्मिता लाडे, डॉ. अंजली फडके, डॉ. वैशाली बडदे, डॉ. कृष्णा फुलसौंदर हे सदस्य आहेत.

लहान मुलांची काळजी घेण्यासाठीच्या टास्क फोर्स समितीचे डॉ. अजय गर्जे अध्यक्ष, तर डॉ. मयूर जोर्वेकर, डॉ. शंतनू सरवार, डॉ. वैशाली बडदे सदस्य, डॉ. आतिष काळे सचिव आहेत.''

तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले, ""आमदार काळे यांनी सरकारी यंत्रणेला पाठबळ दिल्याने बाधित रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे.''

(Health system alerts to prevent third wave of corona)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com