सुवर्णा कोतकर यांच्या अटकपूर्व जामीनअर्जावर आज सुनावणी

Hearing on pre-arrest bail application of Suvarna Kotkar today
Hearing on pre-arrest bail application of Suvarna Kotkar today

नगर : केडगाव दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी सुवर्णा कोतकर यांच्या अटकपूर्व जामीनअर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयासमोर सुनावणी झाली. आरोपी पक्षातर्फे आज बाजू मांडण्यात आली. उद्या सरकार पक्ष बाजू मांडणार असल्याचे सूत्रांकडून समजले. 

महापालिका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर केडगावमध्ये दोन शिवसैनिकांची हत्या झाली. या गुन्ह्यामध्ये नगरसेवक सुवर्णा कोतकर यांचे नाव आरोपींच्या यादीत समोर आले होते. घटना घडल्यापासून त्या अद्यापपर्यंत पसार होत्या. दोषारोपत्रामध्ये त्यांना फरार घोषित करण्यात आले होते.

त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर आज आरोपी पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडण्यात आली. फिर्यादीमध्ये सुवर्णा कोतकर यांच्या नावाचा उल्लेख नाही.

राजकीय हेतूने त्यांच्या नावाचा गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे, असा युक्तिवाद ऍड. नितीन गवारे यांनी केला. न्यायालयाने आरोपी पक्षाचे म्हणणे ऐकून घेतले. सरकार पक्ष उद्या बाजू मांडणार असल्याचे सूत्रांकडून समजले. 
..... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com