शिर्डीत जल्लोष केल्याने ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षांसह चाळीस जणांवर गुन्हा

सतीश वैजापूरकर
Thursday, 10 December 2020

या सर्वांनी एकत्र जमाव जमवून व घोषणा देऊन सामाजिक अंतर न पाळता जिल्हाधिका-यांच्या आदेशाचा भंग केला. तसेच कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठीच्या प्रतिबंधक कायद्यान्वे दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले

शिर्डी ः भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना सुपा येथे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच येथे एकत्र जमून जल्लोष करणा-या तीस ते चाळीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी फिर्याद दिली आहे. त्यान्वये साथ रोग नियंत्र कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलमांच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा - नगरमध्ये फुलली गांजाची शेती, तीनजणांनी केली लागवड

त्यात ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे (पुणे) तसेच शहर व परिसरातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते धनंजय पाटील, वंदना गोंदकर, मनिषा शिंदे, रेखा वैद्य, स्वाती परदेशी, अलका कोते, सुनील परदेशी, नानासाहेब बावके, शिवाजी चौधरी, शोभा कर्पे व रूपाली तांबे यांच्यासह तीस ते चाळीस कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

या सर्वांनी एकत्र जमाव जमवून व घोषणा देऊन सामाजिक अंतर न पाळता जिल्हाधिका-यांच्या आदेशाचा भंग केला. तसेच कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठीच्या प्रतिबंधक कायद्यान्वे दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले, असे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. 
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forty people, including Brahmin Federation President Anand Dave, have been booked