
शहरटाकळी: शेवगाव तालुक्यातील खामगाव, हिंगणगाव, गुंफा, जोहरापूर, भातकुडगाव शिवारात गेल्या चार दिवसांपासून पाऊस होत आहे. हा पाऊस अतिवृष्टी सारख्या होत असल्याने त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गुंफा येथील महादेव आहेर यांच्या कपाशीची नासाडी झाली. शंभर टक्के नुकसान होऊनही पंचनामा न झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.