
-सचिन सातपुते
शेवगाव : तालुक्यात मे महिन्यात कधी नव्हे ते पडत असलेल्या संततधार पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. खरीपाच्या पूर्वमशागतीची कामे खोळंबली आहेत. रस्ते चिखलाने माखले असून ओढ्या नाल्यांना पाणी आले. शेतात सखल जागी पाणी साचले आहे. यामध्ये कांदा, भुईमूग व फळबागांचे नुकसान झाले आहे. कालपासून सुरू असलेल्या पावसाने ६० ते ६५ मिलीमीटरची पातळी ओलांडली असून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे.