
Hemant Ogle interacting with distressed farmers in flood-hit villages after crops drowned in heavy rains.
Sakal
श्रीरामपूर: साहेब, डोळ्यासमोरच पिकं बुडालेली पाहतोय, आता संसार कसाबसा चालवायचा – हरेगावमधील एका शेतकऱ्याच्या या शब्दांत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची हळहळ दाटली होती. उभ्या शेतकऱ्यांच्या वेदनांना थेट स्पर्श करत आज आमदार हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघातील हरेगाव, उंदीरगाव, माळेवाडी, मुठेवडगाव, माळवडगाव, भामाठाण व खानापूर या गावांचा दौरा केला.