Ahmednagar : सोयाबीन वाचविण्यासाठी ड्रोनची मात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar

Ahmednagar : सोयाबीन वाचविण्यासाठी ड्रोनची मात्रा

कोल्हार : शेतातील अतिवृष्टीग्रस्त सोयाबीनचे पीक वाचविण्यासाठी ड्रोनद्वारे औषधफवारणीची मात्रा लागू पडत आहे. प्रवरा परिसरातील शेतकऱ्यांनी स्वीकारलेले हे आधुनिक तंत्रज्ञान आशादायी ठरू लागले आहे. अस्मानी संकटाच्या फेऱ्यात सापडलेल्या सोयाबीन उत्पादकांची उभी पिके वाचविण्यासाठी सध्या धडपड सुरू आहे.

याबाबत राजुरी येथील कृषितज्ज्ञ बाबासाहेब गोरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, की योग्य निचरा असलेल्या जमिनीतील सोयाबीनची परिस्थिती अजून बरी आहे. मात्र, भारी जमिनीतील सोयाबीनचे पीक अतिवृष्टीमुळे गेल्यात जमा आहे. ते वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. नव्या, जास्त उत्पादन देणाऱ्या जातींमध्ये ज्या पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन होणे आवश्यक होते, त्या पद्धतीने ते केले गेले नाही. ज्यांनी ते केले, त्यांच्या जमिनीत खतांचा निचरा झाला.

त्यामुळे सोयाबीनच्या दाण्यांच्या फुगवट्यासाठी लागणारे अन्नद्रव्य मिळत नाही. परिणामी, रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढला.सध्याची परिस्थिती अशी आहे, की सोयाबीनची वाढ गुडघ्यापर्यंत झालेली असल्याने शेतात फिरून फवारणी करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे फवारणीचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र, जोराचा वारा आल्यावर फवारणी करता येत नाही. तसेच, शेतावरून उच्चदाब विद्युतवाहिनी गेली असल्यास अडचण येते.

सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकात जाता येत नव्हते. अळी व किडींचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तो थांबविण्यासाठी ड्रोनने फवारणी करणे सुलभ होत आहे. या तंत्रामुळे दोन तासांत बारा एकर क्षेत्राची फवारणी करणे शक्य झाले.

- गीता अमोल थेटे, अध्यक्ष, प्रवरा फळे- भाजीपाला संस्था

Web Title: Heavy Rain Soybeans Crop Farmer Modern Technology Drone Soybeans

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..