भंडारदरा- मुळा पाणलोट क्षेत्रात श्रावण सरींची बरसात

शांताराम काळे
Tuesday, 11 August 2020

भंडारदरा- मुळा पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असून श्रावण सरीची बरसात पाहायला मिळत आहे.

अकोले (अहमदनगर) : भंडारदरा- मुळा पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असून श्रावण सरीची बरसात पाहायला मिळत आहे. पाऊस उसंत न घेता आपले अविष्कार दाखवून संपूर्ण परिसर जलमय करीत आहे. त्यामुळे भंडारदरा जलाशयात वेगाने आवक वाढत आहे. जलाशयात 7500 दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून वाकी जलाशयातून 569 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे.

मुळा नदीतून चार हजार क्युसेक्सने प्रवाह सुरु होता. त्यामुळे कृष्णवंती नदी वाहती झाली. निळवंडे  जलशयातही पाण्याची आवक दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे पाणी आल्याने रंधा धबधबा व कातळपूर ओढ्यावरील धबधबा अवतीर्ण झाला. या धबधब्याचे जवळ काही पर्यटक येऊ लागले आहेत. या धबधब्याजवळ बंदोबस्त दिसत नसून जलसंपदा विभागाचे कर्मचारीही नसल्याने रंधा धबधब्याजवळ लोक गर्दी करू लागले आहेत. 

आवणीची कामे अंतिम टप्प्यात आले असून शेतकरी आपल्या कामात व्यग्र दिसत आहे. काल झालेला पाऊस भंडारदरा 57 मिलीमीटर, घाटघर 95 मिलीमीटर, पांजरे 36 मिलीमीटर, रतनवाडी 54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर 63.40 टक्के भंडारदरा जलाशय भरले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rainfall in Bhandardara Mula catchment area of ​​Akole taluka