"जाती"वंत स्पर्मला मोठी मागणी...! जाणून घ्या सविस्तर, काय आहे प्रकार?

High demand for semen of certain breeds from women
High demand for semen of certain breeds from women

अहमदनगर ः आपल्याकडे लैंगिक शिक्षणाचा विषय काढला तरी नाक मुरडणारी माणसं आहेत. अजूनही स्थिती फारशी बदलेली नाही. एखाद्या दाम्पत्याला मूल होत नसेल तर दोष महिलेचाच; त्यात पुरूषाचा दोष नसतोच, असा मानणारा आपला समाज आहे. बहुतांश वेळा पुरूषांमध्येच दोष असतो. दोष म्हणजे काय तर त्याच्या वीर्यात मूल जन्माला घालता येईल एवढे प्रभावी घटक नसतात. त्यामुळे अनेकजण संतानहीन राहतात. परंतु महिलेला निपुत्रिक म्हणून हिणवले जाते.

अलिकडे विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. त्यातूनच टेस्ट ट्यूट बेबी, सरोगेट मदरसारख्या संकल्पना पुढे आल्या. म्हणजे काय तर गर्भाशय भाड्याने द्यायचे. ज्या महिलेला मूल होऊ शकत नाही, किंवा तिच्या पोटात गर्भधारणा होत नसेल तर सरोगसी मदरचा आधार घेतला जातो. तर उलट विचार केला तर ज्या पुरूषाच्या वीर्यातून मूल जन्माला येत नसेल तर त्यालाही पर्याय आहे.

बॉलीवूडमुळे क्रांती

बॉलीबूडमधील काही अभिनेता आणि अभिनेत्री लग्नाअगोदर आई किंवा बाप बनले आहेत. यात तुषार कपूरचे उदाहरण देता येईल. एकल पालक संकल्पना रूढ होते आहे. सनी लिओनीनेही मूल दत्तक घेतले आहे. स्पर्म डोनेट संकल्पनेवर आधारीत विकी डोनर नावाचा सिनेमा येऊन गेलाय. 

अंधश्रद्धेतून भोंदू बाबांकडून शोषण

पूर्वी ज्या महिलेला संतानप्राप्ती होत नसायची, त्या महिला अंधश्रद्धेतून भोंदूबाबांच्या कह्यात जायच्या. ते बाबा त्याचे लैंगिक शोषण करायचे. आजही काही ठिकाणाहून तशा बातम्या येतात. परंतु विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. स्पर्म बँकेतून तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वीर्य विकत घेऊ शकता आणि त्याला कायद्यासोबत नैतिकतेचीही अधिष्ठानही आहे. त्यामुळे कोणी नाजायज औलाद वगैरे म्हणू शकत नाही.

स्पर्म बँक म्हणजे काय?

पाश्चात्य देशात स्पर्म बँक ही संकल्पना तेथील लोकांच्या अंगवळणी पडली आहे. आपल्या देशात पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगलुरूसारख्या शहरात ती रूजली आहे. अगदी जिल्ह्याच्या ठिकाणावरही स्पर्म बँका आहेत. या बँकेत एखादा डोनर आपले वीर्य दान करू शकतो. त्यासाठी त्याला किमान पाच हजार रूपये दिले जातात. त्यापेक्षाही मोठी रक्कम मिळू शकते. वीर्यदान करणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाते. त्याने दिलेले वीर्य संतानहीन महिलेच्या गर्भाशयात ते शास्त्रीय पद्धतीने सोडले जाते. वीर्य दान करणाऱ्याला आपले वीर्य कोणाला दिले याची कल्पना नसते. मात्र, ज्या महिलेला आपल्या गर्भात वीर्य घ्यायचे आहे, तिला व तिच्या कुटुंबाला सर्व माहिती दिली जाते. त्या पुरूषाची इत्थंभूत माहिती डॉक्टर संबंधित दाम्पत्याला सांगतात. त्याचा पेशा, त्याचे विचार, आजार, फॅमिली हिस्ट्री, वजन, उंची, वर्ण, जाती अशी सगळी नोंद स्पर्म बँकेकडे असते. वीर्यदात्याचे सर्व माहिती तपासून घेतल्यानंतरच कोणाचे वीर्य घ्यायचे हा निर्णय सर्वस्वी त्या महिलेच्या कुटुंबांवर किंवा तिच्यावर अवलंबून असतो, असे डॉ. अनुराधा सांगतात.

कोण करू शकतं वीर्य दान?

वीर्य दान केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळत असले तरी ही उदात्त संकल्पना आहे. एखाद्याला तुम्ही संतानसुख देऊ शकता. किंवा एखाद्याचे बाप बनू शकता. ज्याला वीर्य दान करायचे आहे, तो सुदृढ असणे ही पहिली अट आहे. त्याचे वय किमान १८ ते ४० च्या घरात असायला हवे. त्याच्या रक्त, लघवीची तपासणी केली जाते. एचआयव्ही,हेपेटाइटिससारखे आजार तर नाहीत ना, याचीही तपासणी होते. वीर्यदाता बनायचे असेल तर दर सहा महिन्याला त्याची शारीरिक तपासणी गरजेची आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या वीर्याची टेस्ट केली जाते. त्यातून मूल जन्माला जाणार असेल तरच त्याचे वीर्य घेतले जाते. वीर्य घेण्यापूर्वी त्याने किमान ४८ तास हस्तमैथून किंवा संभोग केलेला नसावा.

विशिष्ट वीर्याला मागणी

वीर्यदानामुळे महिलेला संतानप्राप्ती होऊ शकते. स्पर्म बँकेतून किंवा क्लिनिकमधून वीर्य घेताना विशिष्ट प्रकारच्या वीर्याला जास्त मागणी आहे. वीर्यदात्याचा वर्ण, त्याचे शिक्षण, बुद्धिमत्ता, भावभावना यांचाही विचार केला जातो. निर्व्यसनी, बहुभाषिक, शारीरिकदृष्ट्या सुदृढ व्यक्तीच्या वीर्याला मोठी मागणी आहे. एकंदरीत "जाती"च्या (उच्च प्रतीच्या) वीर्याला भाव आहे. याचा मूल जन्माला घालताना उपयोग होतो की नाही, हे माहिती नाही. परंतु समाजात तशी मानसिकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com