राहुरीत हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

विलास कुलकर्णी
Thursday, 19 November 2020

आज दुपारी पोलिसांनी हॉटेल भोवती सापळा रचला. दोन जणांना ग्राहक बनवून हॉटेलमध्ये पाठवण्यात आले. वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्री झाल्यावर पोलीस अधिकारी व पथकाने छापा टाकला.

राहुरी : राहुरी खुर्द येथे नगर-मनमाड रस्त्याकडेला असलेल्या न्यू भरत हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून हॉटेल चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. परप्रांतीय एका बंगाली तरुणीची पोलिसांनी सुटका केली. 

सय्यद फरहाद इर्शाद अहमद (वय 32, रा. पाण्याच्या टाकी जवळ, राहुरी) असे अटक केलेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. 
राहुरी खुर्द येथे न्यू भरत हॉटेलमध्ये अनेक दिवसापासून राजरोसपणे वेश्या व्यवसाय सुरू होता. त्याची गोपनीय खबर मिळाल्यावर आज (गुरुवारी) दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान श्रीरामपूर येथील परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी आयुष नोपानी, अभिनव त्यागी व उप अधिक्षक संदिप मिटके यांनी कारवाई केली.

पोलिस नाईक रंगनाथ ताके, गणेश फाटक, चालक लक्ष्मण बोडखे, राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, अशोक कुदळे, महिला पोलिस हवालदार नूतन काळखेर यांच्या पथकाने कारवाईत भाग घेतला. 
आज दुपारी पोलिसांनी हॉटेल भोवती सापळा रचला. दोन जणांना ग्राहक बनवून हॉटेलमध्ये पाठवण्यात आले. वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्री झाल्यावर पोलीस अधिकारी व पथकाने छापा टाकला. राहुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. परप्रांतीय एका बंगाली तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेऊन, तिची सुटका केली. 

अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High profile prostitution exposed in Rahuri