
कोल्हार : भगवतीपूर (ता. राहाता) शिवारातील तीन शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागेची ड्रोनद्वारे टेहाळणी करण्यात आली. त्यानंतर सुमारे अडीच लाखांचे पाच टन डाळिंब चोरीस गेले आहेत. पंकज राजेंद्र दळे, मधुकर दादा खर्डे व विलास गणपत दळे अशी डाळिंब चोरीस गेलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी पंकज दळे (रा. भगवतीपूर) यांनी फिर्याद दिली आहे.