esakal | वात, पित्त, कफ जाळून टाकते हे फळ...सहज मिळेल बाजारात
sakal

बोलून बातमी शोधा

Hirda fruit cures many ailments

हे फळ सहज उपलब्ध होते. ते गोड, आंबट, कडू, तिखट, तुरट हे पाच रस आहेत. फक्त खारट रस नाही. यातील गोड, तिखट आणि तुरट रसांमुळे पित्त दोषाचा नाश होतो. कडू, तिखट आणि तुरट रसांमुळे कफ दोष दूर होतो. तर गोड आणि आंबट या रसांमुळे वात दोष दूर होतो

वात, पित्त, कफ जाळून टाकते हे फळ...सहज मिळेल बाजारात

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले: बदलत्या जीवनशैलीमुळे कोणता आजार कधी उदभवेल याची शाश्वती नाही. खान-पानातील बदलही आरोग्यावर परिणाम करतात. मूळव्याध, मुतखडा, कफासारखा आजार कॉमन आहेत. त्यावर बराच पैसा खर्च केला जातो. परंतु त्यातून तब्येतीस पडतोच,असे नाही. मग झाडपाला किंवा वैद्याचा आसरा शोधला जातो. परंतु तिकडेही बर्याचदा फसवणूक होते. सहज उपलब्ध होणारे एक फळ आहे, ते तुम्हाला घरच्या अनेक आजारावर गुणकारी असल्याचे कळेल. वात, कफ आणि पित्तावरही ते फायदेशीर आहे.

हिरडा सहज उपलब्ध होतो. तो गोड, आंबट, कडू, तिखट, तुरट हे पाच रस आहेत. फक्त खारट रस नाही. यातील गोड, तिखट आणि तुरट रसांमुळे पित्त दोषाचा नाश होतो. कडू, तिखट आणि तुरट रसांमुळे कफ दोष दूर होतो. तर गोड आणि आंबट या रसांमुळे वात दोष दूर होतो.

हेही वाचा ः राष्ट्रवादी स्थापनेवेळी हे नेते होते सोबत, दुरावले तर आली पराभवाची नौबत

रड्याचे लघु आणि रुक्ष असे गुण आहेत. लघु म्हणजे ज्या योगाने शरीरात हलकेपणा निर्माण होतो, उत्साह येतो. सामान्यत: लघु गुणाच्या द्रव्यांनी शरीरातील वाढलेला कफदोष कमी होतो. शरीरात ज्या ज्या ठिकाणी मलाची निर्मिती होते. त्या त्या ठिकाणी या गुणाच्या औषधांचा प्रभाव होतो, हिरड्याची फळे मल दोष दूर करतात. रुक्ष म्हणजे शरीरात रूक्षपणा, कठीणपणा येतो. या गुणामुळे शरीरातील वात दोषाचे प्रमाण वाढते, कफ दोषाचे प्रमाण कमी होते. मधुमेह सारख्या रोगात याचा खूप उपयोग होतो.

यावर आहे इलाज

अपचन, अतिसार, आंव पडणे, मूळव्याध, भूक न लागणे, अतिघाम येणे, नेत्ररोग, स्थूलता, अजीर्ण, आम्लपित्त, दाह, रक्तपित्त, कुष्ठरोग, इसब, पित्त्जशूळ, संधिवातज्वर, उदररोग, पांडुरोग, मूतखडा, उचकी, उलटी, अशा अनेक विकारांवर हिरडा महत्त्वाचे औषध मानले गेले आहे. कुपचन रोगांत सुरवारी हिरड्याचा चांगला उपयोग होतो. अतिसार, आंव आणि आंतड्याची शिथिलता यांत चांगला गुण येतो. अर्श (मूळव्याध) रोगात हिरडा सैंधवाबरोबर देतात आणि रक्तार्शांत त्याचा क्वाथ देतात. अर्श सुजून दुखत असल्यास हिरडा उगाळून लेप देतात.

हिरडा जरी बहुपयोगी असला तरी, त्याचा वापर ऋतूप्रमाणे विविध द्रव्यांसह करावा:

 • वसंत ऋतु अर्थात चैत्र, वैशाख मध्ये मधा सोबत,
 • ग्रीष्म ऋतू अर्थात ज्येष्ठ, आषाढ मध्ये गुळा सोबत,
 • वर्षा ऋतु अर्थात श्रावण, भाद्रपद मध्ये सैंधव मिठा सोबत,
 • शरद ऋतु अर्थात आश्विन, कार्तिक मध्ये साखरे सोबत,
 • हेमंत ऋतु अर्थात मार्गशीर्ष, पौष मध्ये सुंठी सोबत, आणि
 • शिशिर ऋतु माघ, फाल्गुन मध्ये पिंपळी सोबत.
 • हिरडा ग्रहण करावा.


फळांच्या रंगावरून हिरड्याच्या सात जाती आहेत 

१) विजया, २) रोहिणी, ३) पूतना, ४) अमृता, ५) अभया, ६) जीवन्ती आणि ७) चेतकी

बाळ हिरडा – फळात अठळी तयार होण्यापूर्वीच आपोआप गळून पडणारे फळ, याचा औषधात विशेष उपयोग होतो. लहान बालकात याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
चांभारी हिरडा – हिरड्याचे थोडे अपरिपक्व फळ म्हणझे चांभारी फळ, उपयोग कातडी कमविण्यासाठी होतो. मोठ्या प्रमाणात निर्यात.
सुरवारी हिरडा – हिरड्याचे पूर्ण पिकलेले फळ म्हणजे सुरवारी, औषधी उपयोग अनेक.
रंगारी हिरडा - याचा उपयोग रंगासाठी होतो.


या वनस्पतीला संस्कृत भाषेत अनेक नावे आहेत

 • हरीतकी - शंकराच्या घरात (हिमालयात) उत्पन्न होणारी, सर्व रोगांचे हरण करते.
 • हेमवती, हिमजा - हिमालय पर्वतावर उत्पन्न होणारी.
 • अभया    - हिरड्याचे नित्य सेवन केल्याने रोगाचे भय राहत नाही.
 • कायस्था    -    शरीर निरोगी, धष्टपुष्ट करणारी.
 • पाचनी    -    पाचन करणारी.
 • प्रपथ्या    -    पवित्र करणारी.
 • प्रमथा    -    रोगांचे समूळ उच्चाटन करणारी.
 • श्रेयसी    -    श्रेष्ठ.
 • प्राणदा    -    जीवन देणारी.
loading image