
पाथर्डी : पहिल्या महायुद्धात वीरगती प्राप्त हुताम्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जुन्या बसस्थानका लगत उभारलेला स्मृर्तिस्तंभ मध्यरात्री वाहनाने दिलेल्या धडकेत कोसळला असून, स्तंभाचे रस्त्यावर पडलेले भग्नावशेष पालिकेने आपल्या ताब्यात घेतले आहेत. १९१४ ते १९१९ साली पहिले महायुद्ध झाले होते. या युद्धात जे जवान हुतामा झाले किंवा लढले त्या जवानांच्या स्मृतिप्रत्यर्थ हा स्तंभ उभारण्यात आला होता.