पारनेरच्या त्या नगरसेवकांना केले होम क्वारंटाइन

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 10 जुलै 2020

पारनेर नगर पंचायतीचे व शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज असलेले त्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होता.

पारनेर ः मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेलेल्या त्या पाच नगसेवकांसह शिवसेनेच्या महिला अाघाडी प्रमुखांना सात दिवस होमक्वारंटाइन केले आहे. मातोश्रीवर जाऊन शिवसेनेच्या बंधानात अडकलेल्या त्या सहाजणांना अाता किमान सात दिवस घरातच अडकून रहावे लागेल. कोरोनाच्या काळात त्यांनी प्रवास केला असल्याने त्यांना सात दिवसांसाठी होम क्वारंटईन करण्यात आले आहे.

पारनेर नगर पंचायतीचे व शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज असलेले त्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होता. प्रवेशानंतर थेट त्याचे पडसाद राज्यपातळीवर आघाडीच्या सरकारवर झाले होते.  

हेही वाचा - म्हणजे आमची काय मारामारी झालीय - मुश्रीफ

त्याचा परिणाम आघाडी धर्म पाळत त्या पाच नगरसेवकांची पुन्हा मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत घरवापसी झाली होती. ते नगरसेवक मुंबईस मातोश्रीवर जाऊन आले असल्याने त्यांना नगरपंचायतीच्या कोरोना नगरपंचायत सुरक्षा समितीने सात दिवसांसाठी होमक्वारंटाईन केले आहे. 

यात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उमाताई  बोरूडे,  नगरसेवक डॉ. मुदस्सीर  सय्यद, नंदकुमार  देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी व नंदा देशमाने यांचा समावेश आहे.

 

या पाच नगरसेवकांसह महिला अाघाडी प्रमुखांनी कामानिमित्ताने प्रवास करण्यासाठी लागणारा ई-पास काढून एक दिवसांचा मुंबई प्रवास केला होता. त्यांनी तेथे फक्त कार्यालयीन काम करणा-या लोकांच्याच भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांचा इतर जनतेशी संबध आला नसल्याने त्यांनी सुरक्षा समितीस सांगितले आहे. म्हणून त्यांना फक्त सात दिवसांसाठी व तेही त्याच्याच घरी  क्वारंटाईन करण्यात आले आहे

- डॉ.सुनीता कुमावत,

सचिव कोरोना समिती नगरपंचायत पारनेर.

आम्ही रीतसर ई-पास काढून एक दिवसांचा मुंबई प्रवास केला आहे. आमचा कार्यालयीन लोकांशिवाय इतर कोणाशीही संपर्क आला नाही. तरीसुद्धा जनतेच्या व आमच्याही कुटुंबाच्या सुरक्षततेसाठी आम्ही क्वारंटाईन झालो आहोत. सरकारी नियमानुसार आम्हला सात दिवसांसाठी होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.

-डॉ. मुदस्सीर सय्यद, नगरसेवक. पारनेर.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home quarantine was done to those councilors of Parner