कुकडीची आवर्तने किती, श्रीगोंदेकरांचे लागले लक्ष

संजय आ. काटे
Thursday, 24 December 2020

"कुकडी'चे रब्बी व उन्हाळी हंगामात प्रत्येकी एक, अशी दोन, तर घोडमधून रब्बीत एक व उन्हाळ्यात दोन, अशी तीन आवर्तने मिळतील, असे समजते. हे दोन्ही नियोजन एकाच वेळी झाले, तर हा निर्णय होऊ शकतो. 

श्रीगोंदे : कुकडी प्रकल्पातील पाच पैकी माणिकडोह व पिंपळगाव जोगे धरणांत उपयुक्त पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे "कुकडी'तून रब्बी व उन्हाळी हंगामात किती व कधी आवर्तने मिळणार, याची उत्सुकता आहे. त्याच्या नियोजनासाठी सोमवारी (ता. 28) पुण्यात कालवा सल्लागार समितीची बैठक होत असून, त्याकडे श्रीगोंदेकरांचे लक्ष लागले आहे. 

कुकडी प्रकल्पातील येडगाव, वडज व डिंबे धरणे यंदा पूर्ण क्षमतेने भरली. मात्र, माणिकडोह, पिंपळगाव जोगे धरणे निम्मेही भरली नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात "कुकडी'च्या लाभधारकांवर संकटाची चाहूल आहे. त्यात ऑक्‍टोबरमध्ये "कुकडी'तील उपलब्ध पाण्याचे नियोजन अपेक्षेप्रमाणे झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही पीकनियोजन करता आलेले नाही. 

हेही वाचा - बापरे, नगरमध्ये इंग्लंडहून आलेत अकराजण

पुण्यात येत्या सोमवारी कालवा सल्लागार समितीची बैठक होत आहे. तीत उपलब्ध पाण्याचे नियोजन होईल. मात्र, तेही केवळ रब्बीचे होते की उन्हाळी हंगामाचेही, याची निश्‍चित माहिती मिळाली नाही.

"कुकडी'चे रब्बी व उन्हाळी हंगामात प्रत्येकी एक, अशी दोन, तर घोडमधून रब्बीत एक व उन्हाळ्यात दोन, अशी तीन आवर्तने मिळतील, असे समजते. हे दोन्ही नियोजन एकाच वेळी झाले, तर हा निर्णय होऊ शकतो. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How many cycles of Kukdi canal, Shrigondekar noticed

Tags
टॉपिकस
Topic Tags: