
कोरोना विषाणूंचे पुढील आवृत्ती इंग्लंडमध्ये समोर आली आहे. या विषाणूचा भारतात प्रसार होऊन नये यासाठी केंद्र सरकारने इंग्लंडमधून येणारी जहाजे व विमानांना भारतात येण्यास परवानगी नाकारली आहे.
नगर ः इंग्लंडमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात विविध ठिकाणी इंग्लंडहून 11जण आल्याची माहिती समोर आली आहे. पाच वेगवेगळ्या कुटुंबातील या व्यक्ती असून, त्यांची कोरोना चाचणी होणार आहे.
गेल्या 28 दिवसांत इंग्लंडहून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून महापालिका दवाखाने अथवा जिल्हा रुग्णालयातून कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूंचे पुढील आवृत्ती इंग्लंडमध्ये समोर आली आहे. या विषाणूचा भारतात प्रसार होऊन नये यासाठी केंद्र सरकारने इंग्लंडमधून येणारी जहाजे व विमानांना भारतात येण्यास परवानगी नाकारली आहे.
गेल्या 28 दिवसांत इंग्लंडवरून आलेल्या नागरिकांची तपासणी सध्या सुरू झाली आहे. इंग्लडहून नगरला आलेल्यांमध्ये मार्केटयार्डमधील 2, कराचीवालानगरमधील 4, गुलमोहोर रस्त्यावरील 3, पाईपलाईनरोड व नवनागापूर येथील प्रत्येकी एक, अशा 11 जणांचा यात समावेश आहे. नगरमधील हे प्रवासी 7, 9, 12, 14, 21 व 22डिसेंबरला आली आहेत.
हेही वाचा - पोपटरावांचे गाव पाहिलं असेल आता शेती पहा, बघा कसे कमावतात
महापालिकेतर्फे या 11 जणांची कोरोबाबत आरटीपीआर चाचणी होणार आहे. या चाचणीमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी एनआयव्ही पुणे येथे पाविण्यात येणार आहे. या तपासणीतून इंग्लंडमधील नवीन विषाणू स्ट्रेनशी मिळताजुळता आहे का, याची तपासणी होणार आहे.
या तपासणीत जे प्रवासी निगेटिव्ह आढळतील त्यांचा पाठपुरावा पुढील 28 दिवस करता होईल. या प्रवाशांच्या सहवासितील लोकांचा शोध घेऊन सर्वांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे. या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांची पाचव्या आणि दहाव्या दिवसादरम्यान आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.