

Compassion in Action: Hingani Dumala Villagers Support Family After Tragic Loss
sakal
-रावसाहेब चक्रे
देवदैठण : हिंगणी दुमाला (ता. श्रीगोंदा) येथील विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या सेवाभावी तरुण गणेश लक्ष्मण मल्लाव यांच्या दशक्रिया विधीप्रसंगी ग्रामस्थांनी एकजुटीचे आणि माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांच्या कुटुंबासाठी तब्बल दोन लाख २० हजार रुपयांचा मदतनिधी उभारला. संकटाच्या क्षणी संपूर्ण गाव एका कुटुंबाप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याने हा प्रसंग अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला.