
Pathardi Accident
पाथर्डी: तालुक्यातील निवडुंगे शिवारात झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या. आज पहाटे झालेल्या या अपघातात आसाराम लक्ष्मण निकाळजे (वय ७०) व त्यांची सून किरण बाळासाहेब निकाळजे (वय ३८, दोघेही रा. ठाकूर पिंपळगाव, ता. शेवगाव) या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर स्वानंदा बाळासाहेब निकाळजे (वय १२) व स्नेहल बाळासाहेब निकाळजे (वय ६) या दोघीजणी गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातात बाळासाहेब निकाळजे हे किरकोळ जखमी झाले.