विजेच्या धक्क्याने पती-पत्नी जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Husband and wife died on the spot due to lightning

विजेच्या धक्क्याने पती-पत्नी जागीच ठार

शेवगाव - शेतामध्ये काम करीत असताना लोखंडी औजारात वीजप्रवाह उतरून विजेच्या धक्क्याने पती-पत्नी जागीच ठार झाले. ही घटना आज (शनिवारी) दुपारी एकच्या सुमारास शेवगाव शहरानजीक खुंटेफळ रस्त्यावरील कांबळे वस्तीवर घडली. जालिंदर एकनाथ कांबळे (वय 31) नीता जालिंदर कांबळे (वय 27) अशी मृतांची नावे आहेत.

शेवगाव शहरानजीक खुंटेफळ रस्त्यावरील कांबळे वस्तीवरील जालिंदर व नीता कांबळे हे कपाशीच्या पिकामध्ये लोखंडी औजाराने मशागत करीत होते. त्यावेळी बांधाशेजारून जमिनीमध्ये पुरलेली विजेची केबल त्यांच्या लोखंडी औजारामध्ये गुंडाळली गेली. त्यामुळे औजारात वीजप्रवाह उतरला. त्यामुळे जालिंदर जागीच कोसळले. पती अचानक पडलेले दिसल्याने नीता कांबळे त्यांना उठवण्यासाठी गेल्या असता त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्यात ते दोघेही जागीच ठार झाले. त्यांच्या लहान मुलीने हा प्रकार पाहून घरच्यांना सांगितले.

परिसरातील शेतक-यांनी व नातेवाइकांनी त्यांना शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कांबळे यांच्यामागे आई-वडील, भाऊ, एक वर्षाचा मुलगा, चार वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Husband And Wife Died On The Spot Due To Lightning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top