संसाराचा डाव मोडला! पत्नीच्या प्रियकराची कबुली; पतीची सासुरवाडीत आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wedding

पत्नीच्या प्रियकराची कबुली; पतीची सासुरवाडीत आत्महत्या

संगमनेर (जि.अहमदनगर) : प्रेमाला बंधन नसते तर वय, जात आणि नात्याची सीमा नसते, असे म्हटले जाते. परंतु, सध्या प्रेमाचे रूपांतर आता अनैतिक संबंधात होत आहे. शारीरिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजेच प्रेम, असा समज निर्माण झाला आहे. अल्पवयीन मुला-मुलींपासून ते विवाहित महिला व पुरुषांपर्यंत हे पसरत चालले आहे. क्षणिक सुखासाठी विवाहबाह्य संबंधामुळे अनेकांचे वैवाहिक जीवन उद्‌ध्वस्त होत असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. संगमनेरमध्येही अंगावर काटा आणेल अशी घटना घडली आहे.

संगमनेरमध्येही अंगावर काटा आणणारी घटना

पतीच्या मोबाईलवर एका दुखावलेल्या प्रियकराने तिच्याशी असलेल्या संबंधाची कबुली चॅटिंग व व्हिडिओ क्लिपच्या पुराव्यासह व्हॉटसअॅपवर पाठवल्याने पत्नीविषयी त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीवरच आरोप करीत तिने घटस्फोटाची मागणी केली. अखेर पत्नी व तिला पाठीशी घालणाऱ्या पालकांना कंटाळून त्याने नुकतेच मध्यरात्री सासुरवाडीत जाऊन, विषारी औषध प्राशन केले. त्याला बेशुध्दावस्थेत संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात व नंतर घोटी येथील रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. नुकतेच त्याचे निधन झाले. या प्रकरणी त्याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी पत्नी, तिचे आई, वडील, भाऊ व मोबाईल धारक अशा पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: कंठ दाटून आला, हुंदका अनावर झाला !

प्रियकरासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

एक वर्ष वयाचा मुलगा असतानाही पत्नीचे माहेरी असलेले नाजूक संबंध तिच्या प्रियकराने सोशल मिडीयावर पुराव्यासह पाठवल्याने, झालेल्या वादातून, नाशिक जिल्ह्यातील एका गावातील व्यक्तीने संगमनेर तालुक्यातील सासुरवाडीत येवून विष प्राशन केले. आठवडाभर मृत्यूशी झुंज देत त्याने अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात प्रियकरासह पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: अहमदनगर : जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

Web Title: Husband Commit Suicide Sangamner Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..