
मंत्री तनपुरे म्हणाले, ""खासदार पवार यांनी जातीपातीच्या, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संकुचित विचारावर सीमित न राहता; दूरदृष्टीच्या विकासात्मक राजकारणातून सामान्य माणसाच्या हिताचा विचार केला.
राहुरी, : ""महाविकास आघाडी सरकार स्थापनेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची बहुमोल भूमिका राहिली. पुढच्या अनेक पंचवार्षिकमध्ये सरकार स्थापनेतही त्यांचा वाटा राहील.
सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून, दूरदृष्टीने विकासात्मक राजकारण करणारे देशातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व खासदार पवार आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे भाग्य लाभत आहे. त्यांची शतकपूर्ती साजरी करू,'' असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
हेही वाचा - नगरचे कलेक्टर राहतात महालात
राहुरी येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अभीष्टचिंतनाच्या व्हर्च्युअल रॅलीप्रसंगी मंत्री तनपुरे बोलत होते. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष निर्मला मालपाणी, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, ज्येष्ठ नेते सुरेश वाबळे, रोहिदास कर्डिले, नगराध्यक्ष अनिता पोपळघट, उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
मंत्री तनपुरे म्हणाले, ""खासदार पवार यांनी जातीपातीच्या, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संकुचित विचारावर सीमित न राहता; दूरदृष्टीच्या विकासात्मक राजकारणातून सामान्य माणसाच्या हिताचा विचार केला.
18 वर्षांच्या तरुणांना लाजवेल असे काम सुरू आहे. शेती, व्यापार, कला, क्रीडा, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांत त्यांचा अनुभव, व्यासंग मोठा आहे. मंत्रिमंडळातील किचकट, धोरणात्मक निर्णय घेताना त्यांचा सल्ला घेतला जातो.''