Ahmednagar : संतांमुळे महाराष्ट्रात वैचारिक प्रगल्भता ; अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवार

संतांमुळे महाराष्ट्रात वैचारिक प्रगल्भता ; अजित पवार

पारनेर : संत तुकाराम महाराज यांच्या विचाराचे संत निळोबाराय पाईक होते. राज्याला संत विचारांची मोठी परंपरा आहे. संत विचारांनी महाराष्ट्राची भूमी वैचारिकदृष्टया प्रगल्भ केल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

पिंपळनेर(ता.पारनेर) येथे संत निळोबाराय अभंग गाथेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील होते. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार नीलेश लंके, निळोबाराय महाराजांचे वशंज गोपाळकाका मकाशे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले असतानाही यावर मार्ग काढत पालखी सोहळ्याची परंपरा महाविकास आघाडी सरकारने खंडित होऊ दिली नाही. याकामी वारकरी संप्रदायानेही सहकार्याची भूमिका घेतल्याने त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. यात राज्य सरकारनेही आपला वाटा उचलला आहे. या मार्गावर वृक्षारोपण करणे, मुक्कामाच्या ठिकाणी सुविधा निर्माण करणे यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. पिंपळनेर येथील वाड्याचा जिर्णोद्धार व सभामंडपासाठी राज्य सरकारच्या वतीने ५० लाखांचा निधी जाहीर केला. यावेळी गृहमंत्री पाटील, महसूलमंत्री थोरात, यांनीही विचार मांडले.

loading image
go to top