esakal | कोरोना उपचाराचे बिल लाखाच्या पुढे आकाल्यास यांच्याकडे करा तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

If the Corona treatment bill goes beyond one lakh, complain to them

काही रुग्णालयांमध्ये कोविड बाधीत रुग्णांकडून बिलापोटी शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादेपेक्षा जास्त दर आकारले  जात असल्याबाबतच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत होत्या.

कोरोना उपचाराचे बिल लाखाच्या पुढे आकाल्यास यांच्याकडे करा तक्रार

sakal_logo
By
अमित आवारी

नगर ः नगर जिल्ह्यात कोरोनाचा सध्या धुमाकूळ सुरू आहे. राजापासून रंकापर्यंत बहुतेकजण बाधित झाले आहेत. या आजारातून बरे होणाऱ्याचे प्रमाण ८० टक्क्यांच्या घरात आहे. परंतु अनेकांना खासगी कोविड सेंटरमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात. काही कोविड सेंटरवाले रूग्णांना अव्वाच्या सव्वा बिल लावत आहेत.

जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये कोविड बाधित रुग्णांकडून उपचारापोटी आकारण्यात येणाऱ्या बिलाची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास या बिलाची भरारी पथकाद्वारे तपासणी करण्यात येईल. तपासणीअंती निश्चित होणारी बिलाची रक्कम संबंधित रुग्णालयास द्यावी लागेल, असे आदेश आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यातील रुग्णालयांकडून कोविड बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणारे शुल्क व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत करण्यात येणारे उपचार व योजनेचा लाभ इत्यादी बाबतची तपासणी करणे कामी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत.  

जिल्ह्यातील काही रुग्णालयांमध्ये कोविड बाधीत रुग्णांकडून बिलापोटी शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादेपेक्षा जास्त दर आकारले  जात असल्याबाबतच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत होत्या. त्यामुळे कोविड बाधित रुग्णांचे रुपये 1 लाखापेक्षा जास्त रकमेच्या बिलांची भरारी पथकाद्वारे तपासणी करणे आवश्यक असल्याने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

हेही वाचा - या कारणातून झाले श्रीगोंद्याचे हत्याकांड

साथरोग अधिनियम 1897 अन्वय निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्राप्त अधिकारानुसार हे आदेश जारी करण्यात आले.

भरारी पथक बिलांची तपासणी करून तपासणी अहवाल तहसीलदार तथा घटना व्यवस्थापन यांचेकडे सादर करतील. तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक यांनी भरारी पथकाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा वेळोवेळी आढावा घेऊन अहवाल दर सोमवारी या कार्यालयास सादर करावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.  

संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top