या कारणातून घडले श्रीगोंद्याचे हत्याकांड, एकट्यानेच असे लोळवले चौघांना; तपास निघाला नाशिकच्या दिशेने

Massacre of four in Shrigonda
Massacre of four in Shrigonda

श्रीगोंदे (अहमदनगर)ः जिल्ह्याबाहेरील (नाशिक परिसर) दोन महिलांसह काही लोक एका वाहनातून विसापुर फाटा येथे आले. त्यांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. यातूनच चौघांचा गेम झाला. स्वस्तात सोने महागातच नव्हे तर जिवावरच बेतले. या हत्याकांडाने काल नगर जिल्हा हादरून गेला होता.

आपली फसवणूक होवू शकते याची शक्यता असल्याने नाशिक परिसरातील लोक तयारीनिशी आले होते. त्यातील एका उंच असणाऱ्या व्यक्तीने हातात चाकु लपविला होता.

इकडेही प्लॅनिंग चालले होते. ठरल्याप्रमाणे पैशाची बॅग दिसली की लगेच हिसकावली गेली. मात्र त्याचवेळी त्या समोरच्या व्यक्तीने चाकुचे सपासप वार करीत त्या चौघांचा खातमा केला. त्यानंतर तेथून पसार झाल्याची खात्रीशिर माहिती मिळाली.

जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश सिंह रात्रीपासून बेलवंडी पोलिस ठाण्यात तळ ठोकुन असून तपासाची सुत्रे त्यांच्याकडेच घेतली आहेत. काल दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास झालेल्या या थराराचे वास्तव वेगळेच निघत आहे.

मयतच्या आईने तिच्या सख्या भाच्यांविरुध्द बेलवंडी पोलिसात फिर्याद दिली आहे. यात अक्षय उंबऱ्या काळे, मिथुन उंबऱ्या काळे  व इतर चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी तिचा मुलगा नाथीक कुंज्या चव्हाण, श्रीधर चव्हाण, नागेश चव्हाण व लिंब्या हावऱ्या काळे  यांचा खून केला. त्यासाठी फिर्यादीत पुर्वीचे वैर दाखविण्यात आले आहे.

पोलिसांनी फिर्यादीनूसार गुन्हा दाखल केला असला तरी या घटनेतील न दिसणारी तपासाची दिशा आता उलगडत असल्याची माहिती मिळाली आहे.

असे रचले आणि असे घडले कांड

समजलेल्या माहितीनूसार, नाशिक जिल्ह्यातील काही व्यक्ती स्वस्तात सोने घेण्यासाठी विसापुरफाटा येथे आले होते.त्यांच्यासमेवत काही महिलाही असल्याचे समजते. त्यांच्याकडे नोटांनी भरलेली बॅग होती. ठरलेल्या व्यवहारात पैसे देवून सोने घेण्याचे ठरले होते. सोन्याच्या नावाखाली ड्राॅप करण्याचा फंडा अनेक वर्षांपासून श्रीगोंद्यात सराईतपणे सुरु आहे. आपण फसले जावू शकतो याची शक्यता असल्याने समोरुन सोने घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीही तयारीत होत्या.

पैसे घेवून सोने देण्यासाठी काही व्यक्ती समोर आले आणि इतर दबा धरुन बसले होते. पैशाची बॅग दिसली की ती हातातून हिसकावली आणि पळू लागले. त्याचवेळी सोने घेण्यासाठी आलेल्या एका उंच व्यक्तीने हातात लपवून ठेवलेला चाकु बाहेर काढत ज्याने बॅग हिसकावली त्यावर वार केला.

तो ओरडल्याने लपून बसलेले काही व्यक्ती समोर आले. त्यावेळी त्या चाकुधारी व्यक्तीने त्यांच्यावरही सपासप वार सुरु केल्याने इतरांनी तेथून धूम ठोकली. सोने घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी लगेच जवळच लावलेल्या त्यांच्या वाहनाकडे धाव घेतली आणि तेथून पसार झाल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिसांचे एक पथक त्या आरोपींच्या शोधासाठी गेल्याचीही माहिती आहे.

एक मिनिटही झोपले नाहीत

नगरचे एसपी घटना घडल्यानंतर काल रात्री जिल्हा पोलिस अधिक्षक अखिलेश सिंह हे येथे आले. ते रात्रीपासून बेलवंडी पोलिस ठाण्यात ठाम मांडून बसेल असून चार जणांची हत्या झाल्याने ते गंभीरतेने तपास करीत आहेत. त्यांच्यासोबतच इतर पोलिस रात्रीत एक मिनिटही झोपले नसल्याचे समजले. त्यातच स्वस्त सोन्याच्या आमिषाने येथे आलेल्या लोकांनी हत्या केल्याचे समोर येत असल्याने सगळ्यांच्याच झोपा उडाल्या आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com