दिल्ली दरवाजा मार्गे जाल तर थेट पोहोचाल स्वर्गात

If you go through Delhi Gate, you will reach heaven directly
If you go through Delhi Gate, you will reach heaven directly
Updated on

नगर ः शहराला उपनगरांशी जोडणारा दिल्लीगेट रस्ता हा महापालिकेच्या कामांची वेगळीच कथा सांगतोय. हे ऐतिहासिक दिल्ली गेट आहे. या परिसराची कितीही उज्ज्वल परंपरा असली तरी तेथून जाणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. डेरिंग करून जर गेलाच तर थेट स्वर्गात पोहोचाल. कारण तो मृत्यूमार्ग बनला आहे.

मागील 15 वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च होऊनही या रस्त्याचे काम उत्कृष्ट होत नाही. काल (बुधवारी) रात्री दिल्लीगेट रस्त्यात काम सुरू असल्याने रस्त्याच्या कडेने ट्रक चालला होता. ट्रकचे वजन कॉंक्रेट रस्ता व त्याखालील भुयारी गटारीच्या पाईपला न पेलवल्याने भगदाड पडले आहे. 

पत्रकार चौक ते नेप्ती नाका हा सुमारे चार किलोमीटरचा रस्ता. या रस्त्यास खेटूनच पाच महाविद्यालये, चार शाळा, एक शासकीय कार्यालय, एक शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची वसाहत आहे. शिवाय सावेडी उपनगर व औरंगाबाद व मनमाड रस्त्यांना कल्याण रस्त्याशी जोडणारा महत्त्वाचा व जवळचा रस्ता. त्यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावर मोठी रहदारी असते.

2007 च्या सुमारास या रस्त्याला राज्य महामार्ग ठरवत 8 कोटी रुपये देण्यात आले. मात्र, रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने या रस्त्याची वर्षभरात दुरवस्था झाली. रस्त्याची दशा सुधारण्यासाठी न्यू आर्टस कॉलेज ते नीलक्रांती चौक रस्त्यासाठी पुन्हा निधी मिळविण्यात आला. त्यातून कॉंक्रिटीचा रस्ता झाला. उर्वरित रस्त्यावर पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून डांबराची ठिगळे चिटकविण्यात येत आहेत. 

15 दिवसांपूर्वीच दिल्लीगेट ते नेप्ती चौक येथील कॉंक्रिट रस्त्यावर डांबरीकरणाचा मुलामा चढविण्याचा प्रयोग महापालिकेने केला. जिथून या प्रयोगाचा श्रीगणेशा झाला, त्याच ठिकाणी रस्ता व भुयारी गटार खचून मोठे भगदाड पडले. पुन्हा अपघात होऊ नये, म्हणून काही सुजान नागरिकांनी खड्ड्याभोवती बॅरिकेडिंग केले. तुटलेले लोखंडी कठडे लावले. कॉंक्रिटचा रस्ता जागीच खचल्याने उघडे पडलेले गज आपली घातकता दाखवित आहेत. 

नैसर्गिक नाल्यांचे दफन 
कोठला परिसरापासून नालेगावपर्यंत उतार आहे. शहरातील विविध भागातून वाहून जाणारे पाणी सीना नदीला मिळते. पेशवाईचा अस्त होईपर्यंत नाल्यांचा प्रवाह नैसर्गिक होता. मात्र इंग्रजांच्या काळापासून या नाल्यांना भुयारी गटारीचे स्वरूप मिळाले. महापालिका झाल्यावर तर ओढे व नाल्यांना भुयारी गटार असे गोंडस नाव देऊन दफन करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com