esakal | पोस्टात तुमची पॉलिसी आहे काय, तर मग तुमच्यासाठी ही आहे गुड न्यूज
sakal

बोलून बातमी शोधा

If you have a policy in the post, this is good news for you

पोस्ट खात्यावर अजूनही लोकांचा विश्वास आहे. पोस्ट खात्यातील पोस्टमन लोकांनी दिलेल्या सेवेमुळे लोकांचा विश्वास दृढ झाला आहे. सातत्याने पोस्टाने विश्वासपूर्ण व्यवहार केले आहेत. त्या विश्वासाच्या जोरावर पोस्टाने बँकेच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. पोस्टाच्या बँकेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पोस्टात तुमची पॉलिसी आहे काय, तर मग तुमच्यासाठी ही आहे गुड न्यूज

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर : डाक जीवन विमा ही सर्वात कायदेशीर अशी विमा योजना भारत सरकारने १९८४ पासून सुरु केली. सध्या अहमदनगर डाक विभागामध्ये "डाक जीवन विमा अंतर्गत असलेल्या एकूण १ लाख ३९ हजार २७५ पॉलिसी  खंडित आहेत. त्या पुनरूज्जीवीत करण्याची शेवटची संधी आारतीय डाक विभागाने विमाधारकाना दिली आहे.

टपाल जीवन विमा योजना आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनेंतर्गत खंडित झालेल्या पॉलिसी 3० नोव्हेंबर, २०२० पर्यंत पुनरुज्जीवीत करता येतील, अशी नाहिती अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक जालिंदर भोसले यांनी दिली.

हेही वाचा - राहुरीत पोलिस ठाण्याच्या आवारात काय घडलं पहा

ज्या पॉलिसी खंडित झालेल्या असतील तसेच ज्या पॉलिसी सुरु केल्यापासून सतत ५ वर्षे भरणा न केल्याने खंडित पडल्या असतील तर त्यांना पुनरुज्जीवीत करुन, सर्वसामान्य विमाधारकाना विमा लाभ मिळू शकतो. पॉलिसीचे पुनरुज्जीवन करताना विमाधारकांचे स्वास्थ्य चांगले असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. सर्व खंडित विमा पॉलिसी पुनरुज्जीवीत करुन घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोस्ट खात्यावर अजूनही लोकांचा विश्वास आहे. पोस्ट खात्यातील पोस्टमन लोकांनी दिलेल्या सेवेमुळे लोकांचा विश्वास दृढ झाला आहे. सातत्याने पोस्टाने विश्वासपूर्ण व्यवहार केले आहेत. त्या विश्वासाच्या जोरावर पोस्टाने बँकेच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. पोस्टाच्या बँकेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

loading image
go to top