

Tragic Collision in Parner as Dumper Truck Runs Over Bike Rider
sakal
टाकळी ढोकेश्वर: ढवळपुरी (ता.पारनेर) येथील परिसरात सुरू असलेल्या अवैध गौणखनिज वाहतुकीमुळे आणखी एका युवकाचा बळी गेल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. रानमळा फाटा येथे भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडल्याची भीषण घटना शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात राजेंद्र उर्फ जिजाबा लक्ष्मण भनगडे (वय ३२, रा. ढवळपुरी) यांचा जागीच मृत्यू झाला.