
संगमनेर : संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरात गोवंश जनावरांची अवैध कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीनजण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिस पथकाने तपास सुरू केला आहे. ही कारवाई बुधवारी( ता.९) पहाटे दीड वाजेच्या सुमारास केली आहे.