

Simhastha Kumbh Planning Review: Rajesh Agrawal Issues Clear Directions
Sakal
शिर्डी: नाशिक येथे २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तयार केलेला ‘शिर्डी कृती आराखडा’ सर्वसमावेशक आहे. भाविकांची सुरक्षा, आरोग्य व वाहतूक नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य देत या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.