राजकारणात व्यक्तिगत कामांचेच महत्त्व वाढले

The importance of personal work has increased in politics and the problem of employment has arisen lamented MLA Radhakrishna Vikhe Patil.
The importance of personal work has increased in politics and the problem of employment has arisen lamented MLA Radhakrishna Vikhe Patil.

कोल्हार (अहमदनगर) : केवळ राजकारण करण्यासाठी लोकांना प्रलोभने दाखविण्याची सवय लावल्यामुळे सार्वजनिक कामांचे महत्त्व कमी होऊन व्यक्तिगत कामांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे समाज परावलंबी होऊ लागला. रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले, अशी खंत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
रामपूर (ता. राहुरी) येथे जिल्हा सहकारी बॅंकेवर निवडून आल्याबद्दल माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, तसेच ग्रामपंचायतींच्या नूतन सदस्यांचा विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष रावसाहेब साबळे होते. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील, दीपक शिरसाठ, भाऊसाहेब कडू, राजेंद्र साबळे, राहुल साबळे, सर्जेराव खर्डे, शिवाजी घोलप, मच्छिंद्र अंत्रे, सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच बाळासाहेब साबळे व राजेंद्र भोसले उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
विखे पाटील म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकारण तेवढ्यापुरतेच ठेवावे. गावात कटुता न ठेवता, विकासकामांत गावकऱ्यांनी सहभागी व्हावे. यापूर्वी जाहीरनाम्यावर निवडणुका होत, दुर्दैवाने आता तशी परिस्थिती राहिली नाही. सोशल मीडियामुळे लोकांमधील नकारात्मक भूमिका कमी होण्यास मदत झाली.' 

रावसाहेब साबळे म्हणाले, की माझ्या 50 वर्षांच्या राजकीय जीवनात मी ग्रामपंचायतींची अशी निवडणूक कधीच पहिली नाही. पैसेवाले निवडणुकीत उतरले. त्यांनी निवडणुकीत पैशांची उधळपट्टी केली व धिंगाणा घातला, तरी गावकऱ्यांनी आमच्या कामावर विश्वास ठेवला. यावेळी सूत्रसंचालन अनिल लोखंडे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com