esakal | राळेगणसिद्धी : महिला शेतकऱ्याची 'कूल' आयडिया, कामगारांसाठी केला 'हा' प्रयोग

बोलून बातमी शोधा

ralegansiddhi women

उन्हापासून बचाव करण्यासाठी असाच प्रयोग राळेगणसिद्धीतील एका महिला शेतकऱ्याने केला आहे.

राळेगणसिद्धी : महिला शेतकऱ्याची 'कूल' आयडिया, कामगारांसाठी केला 'हा' प्रयोग
sakal_logo
By
एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : सध्या चैत्र महिना असून ऊन चांगलेच तापले आहे. अशा उन्हातही शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरू आहेत. मात्र उन्हाची तमा न बाळगता त्यावर पर्याय शोधत शेतकरी शेतीची कामे करत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी असाच प्रयोग राळेगणसिद्धीतील एका महिला शेतकऱ्याने केला आहे.

हेही वाचा: कोरोनाचा कहर, शहरातून थेट बांधावर..!

सुलभा गाजरे या महिला शेतकऱ्याने शेतातच तंबू उभा करत कांदे काढणीचे व काटणीचे काम सुरू आहे. परिसरात इतर शेतकरी सकाळी लवकर शेतात जाऊन ऊन होण्याच्या आत शेतीचे काम संपवताना दिसत आहे. मात्र गाजरे यांच्या शेतात दिवसभर काम करताना शेतकरी वर्ग दिसत आहे. त्यांच्या या प्रयोगाचे परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. सध्या कांदे, भुईमूग काढणे, जनावरांना चारा आणणे त्याचबरोबर शेतामधील दगड गोळा करणे, शेत नांगरणे, शेताची मशागत करणे, बांधबंदिस्ती करणे, खत पांगवणे अशा विविध स्वरूपाची शेतीची कामे सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

हेही वाचा: शिरापूरमध्ये 50 बेडचे कोविड सेंटर उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

सध्या ऊन खूप आहे. तरीही आम्ही दुपारी शेतात बसून काम करतो. शेतात तंबू उभा केल्यामुळे ऊन लागत नाही. याउलट गप्पा मारत मारत चांगले काम करता येते.

- सुलभा गाजरे, महिला शेतकरी, राळेगणसिद्धी