
पंचायत समितीचा कार्यक्रम ठरल्यापासून ग्रहण लागले होते. ते श्रीरामपूरसाठी नवीन नाहीत. अनेक वर्षाचा श्रीरामपूरचा आपला अनुभव आहेत.
श्रीरामपूर (अहमदनगर) : पंचायत समितीचा कार्यक्रम ठरल्यापासून ग्रहण लागले होते. ते श्रीरामपूरसाठी नवीन नाहीत. अनेक वर्षाचा श्रीरामपूरचा आपला अनुभव आहेत. एखादे काम सरळपणे होवू शकत नाही. काहीतरी त्यात विघ्न आल्याशिवाय काम होत नाही. त्याला जुना इतिहास आहे. परंतू राज्यमंत्री सत्तार साहेबांनी सर्व विघ्न टाळुन आणि वस्तुस्थिती जाणून भुमिपूजन सोहळ्यास हजेरी लावली हे महत्वाचे आहे.
निवडणुकीच्या काळात जो- तो आपल्या परीने काम करतो. निवडणुक झाल्यानंतर सर्वांना सोबत घेवुन काम करावे लागते. पक्ष आणि राजकारणापलिकडे जावून काम केले पाहिजे. पक्षाची भुमिका आणि वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. विकासाचे मंदीर उभारले जात असताना राजकारण बाजुला ठेवुण सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. तालुका ही कुणाची खासगी मालमत्ता नाही. जनतेची ही मालमत्ता आहेत. लोकप्रतिनिधी असल्याने मला विचारुनच कार्यक्रम झाला पाहिजे. मला विचारुनच अधिकारी आले पाहिजेत. हे वाईट आहे. चांगले काम केल्यास लोक तुम्हाला संधी देतील. अशाच प्रकार असे बेलात वागलात. तर ही तुम्हची शेवटची संधी समजा, असा टोला माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
येथील पंचायत समितीच्या नुतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात विखे पाटील बोलत होते. कार्यक्रमासाठी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित नसल्याने चांगलीच राजकीय चर्चेची मैफील रंगली होती. यावेळी विखे पाटील म्हणाले, पंचायत समितीतुन तालुक्याचे अनेक प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे कुणी बहिष्कार घातला म्हणुन कार्यक्रम होत नाही असे नाहीत. कुणासाठी अडथळा निर्माण करायचा आणि का करायचा त्याचे आकलन झाले पाहिजे.
तालुक्यातील मंडळी सुज्ञ आहेत. चांगल्या कार्यासाठी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविणे गरजेचे आहे. बाजार समितीचे काम चांगले चालु असताना काहीजण न्यायालयात गेल. परंतू आपली बाजू सत्य असून चिंता करु नका. नेहमी सत्याचा विजय होतो. राजकारणात राजकीय निर्णय घ्यावी लागतात. त्यामुळे विखे आणि मुरकुटे एकत्रित आल्याने खासदार लोंखडे यांना आपोआप संधी मिळणार.
आम्ही जोपर्यंत खंबीर आहोत. तोपर्यंत लोंखडे यांची संधी जाणे नाही त्यांनी फक्त काळजी घेतली पाहिजे. संघटनेसाठी मतदारसंघात आपल्यासाठी काम केलेल्या लोकांच्या पाठीमागे उभे राहण्याचा सल्ला माजीमंत्री विखे पाटील यांनी खासदार सदाशिव लोंखडे यांना दिला.
यावेळी खासदार लोंखडे म्हणाले, माझा उगम साडेसहा वर्षापुर्वी झाला. आपण आमदार होण्यासाठी मुरकुटे यांच्याकडे आलोत आणि खासदार झालोत. शिवसेनेने उमेदवारी दिल्याने अवघ्या 17 दिवसांत खासदार झालो. श्रीरामपूरच्या राजकारणात कोण कुणासोबत आहेत कहीही कळत नाही. आता मलाही कळेना मी कुणासोबत आहेत. कर्जत- जामखेडमध्ये आपण वनमॅन- शो होतो. आता कळत नाही कोण कुठे आहेत आणि आपण कुणासोबत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संधी दिली आणि मुरकुटे यांच्या मार्गदर्शनामुळे राजकारणात यश मिळाले. मुरकुटे आपले गुरु आहेत. सर्वजण म्हणतात खासदार लोंखडे यांचे सहकार्य लाभले. परंतू त्यासाठी आपण कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आणि मंजूर कामांची कल्पना देखील नसल्यामुळे सत्य झाकले जात नाही. परंतू खासदार म्हणुन आणि कार्यकर्ता म्हणुन सर्वसामान्यांसाठी मुरकुटे आणि विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करण्यास तत्पर असल्याचे खासदार लोंखडे यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार मुरकुटे म्हणाले, आपल्याला शिवसेना पाऊली नाही. राज्यमंत्री सत्तार यांना शिवसेना पाऊली आणि त्यांना मातोश्रीने भरभरुन दिले. तसेच विखे पाटलांनाही शिवसेना पाऊली आहेत. त्यांना एकाचवेळी केंद्रात आणि राज्यात अशी दोन-दोन मंत्रीपदे मिळाली. तसेच खासदार लोंखडे यांच्यावरही शिवसेनेची आणि ठाकरेशाहीची कृपा आहेत. त्यांना सलग खासदार होता आले. राजकारणात टोपीला फार महत्व आहेत. त्यामुळे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी टोपी काढु नयेत. राजकारणात टोपीची संख्या कमी होत असल्याने टोपीचे महत्व वाढल्याचे मुरकुटे यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार भाऊसाहेब कांबळे म्हणाले, आमदार असताना तालुक्यात अनेक विकासकामे केली. कधी लोकांना त्रास दिला नाही. राजकारणात संघर्ष होत असतो. आपण विकासकामे करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. भाऊसाहेब कांबळे साधारण कुटूंबातील आहे. म्हणून आता काही त्यांची खिल्ली उडवता. त्रास देतात हा प्रकार चांगला नाही.
गेल्या दहा वर्षात सामान्य जनतेचे कामे फोनवर केलीत. त्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी एकदा मागे वळुन भाऊसाहेब कांबळे यांची कारकीर्द बघुन घ्यावी. लोकप्रतिनीधी म्हणुन दम द्या. परंतू त्यात आदर असला पाहिजेत. लोकांना तुमची दहशत वाटली नाही पाहिजेत. आपण जनतेचे सेवेकरी आहोत. त्यामुळे सामान्य लोकांना कधीही दुर लोटण्याचा प्रयत्न करुन नका. असा सल्ला माजी आमदार कांबळे यांनी विद्यमान लोकप्रतिनीधी यांना दिला.
संपादन : अशोक मुरुमकर