लंके २५ वर्षे सत्तेत राहणार; इंदुरीकर महाराजांचे समर्थन

तहसीलदार देवरे ऑडिओ क्लिप प्रकरण : इंदुरीकर महाराजांचे लंकेंना समर्थन!
nilesh lanke and indurikar maharaj
nilesh lanke and indurikar maharajesakal

पारनेर (जि. अहमदनगर) : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे (tehsildar jyoti deore) यांनी एका ऑडिओ क्लिपच्या (audio clip) माध्यमातून आत्महत्येचा इशारा दिला आहे. यावेळी ज्योती देवरे यांनी आमदार निलेश लंके (mla nilesh lanke) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे सध्या मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराज (nivrutti maharaj indurikar) यांनी निलेश लंके यांच्या समर्थनात भाष्य केले आहे.

लंके पंचवीस वर्षे सत्तेत राहणार - इंदुरीकर महाराज

‘‘आमदार नीलेश लंके (mla nilesh lanke) यांनी उभारलेल्या कोरोना सेंटरच्या (covid center) माध्यामातून हजारो गोरगरीब रुग्ण मोफत उपचार घेऊन घरी परतले. त्यांचे आशीर्वाद लंके यांना लाभले आहेत. त्यामुळे ते आगामी २५ वर्षे आमदार राहतील,’’ असे उद्‍गार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी काढले. तालुक्यातील भाळवणी येथील शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरात आयोजित हरिनाम सप्ताहात आयोजित कीर्तनात ते बोलत होते. राज्यातील अनेक साखर, शिक्षण सम्राट, उद्योगपती आमदार आहेत. परंतु कुणालाही ही संकल्पना सुचली नाही. लंके यांनी ती प्रत्यक्ष करून दाखवली. देश-विदेशातही या माणसाचा नावलौकिक झाला, तरीही ते सामान्य कार्यकर्ता म्हणून रुग्णांमध्ये बसून कीर्तन ऐकत आहेत. या लंके यांच्या साधेपणाचे कौतुकही इंदुरीकर यांनी केले. लंके यांनी सुरू केलेल्या या कोरोना सेंटरमधून सुमारे २२ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

nilesh lanke and indurikar maharaj
असे अधिकारी पारनेरला नको; देवरेप्रकरणी हजारेंची नाराजी
nilesh lanke and indurikar maharaj
महाविकास आघाडी राज्यात; तालुक्यात नाही - खासदार डॉ सुजय विखे

निलेश लंके केवळ आमदार नाहीत....

गरीबांची सेवा केल्यावर माणूस देव होत नाही. मात्र त्याला देवपण आल्याशिवाय राहत नाही. हजारो रुग्णांच्या उपचारांची व्यवस्था करणारे नीलेश लंके त्या रुग्णांसाठी केवळ आमदार नाहीत तर देव आहेत‌. मानवाची सेवा हीच ईश्‍वर सेवा असल्याचे इंदुरीकर महाराज म्हणाले. “आमदार लंके समाजाच्या भल्यासाठी काम करीत आहेत. चांगले काम करणाऱ्यांना त्रास होतोच. जितका त्रास जास्त होतो तेवढा माणूस मोठा होतो.”, असे देखील इंदुरीकर महाराज म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com