esakal | माळीझापमध्ये बलीप्रतिपदेनिमित्त महाराजा बळीराजाच्या जिवनचरीत्राबद्दल माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Information about the biography of Maharaja Baliraja on the occasion of Balipratipada in Malizap

माळीझाप (ता. अकोले) येथे संत सावता महाराज सभागृहात बलीप्रतिपदेच्या निमित्ताने महाराजा बळीराजाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

माळीझापमध्ये बलीप्रतिपदेनिमित्त महाराजा बळीराजाच्या जिवनचरीत्राबद्दल माहिती

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : माळीझाप (ता. अकोले) येथे संत सावता महाराज सभागृहात बलीप्रतिपदेच्या निमित्ताने महाराजा बळीराजाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकोले नगरपंचायतीचे नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी केले. शेतकऱ्यांचा राजा बळीराजा यांचा स्मृतीदिन का साजरा करणे आवश्यक आहे, याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महाराजा बळीराजाच्या जिवनचरीत्राबद्दलची माहिती अशोक मंडलिक यांनी उपस्थितांना सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काकड होते. यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करताना बळीराजा विषयी माहिती सांगितली व युवकांनी वाचन संस्कृती वाढवावी असे आवाहन केले. हेमंत मंडलिक यांनी मानले. 

कार्यक्रमासाठी शिवाजी चौधरी, दत्ता रत्नपारखी, भाऊसाहेब वाकचौरे, एकनाथ मंडलिक, सोन्याबापू मंडलिक, नंदकुमार चौधरी, मालूंजकर, मच्छिंद्र मंडलिक, गोरख मंडलिक, भाऊसाहेब मंडलिक, विश्वजित मंडलिक, दिलीप थोरात, सुदाम मंडलिक, सोमनाथ मंडलिक, प्रा. डॉ. नंदकुमार मंडलिक, संगिता मंडलिक, सुवर्णा मंडलिक, रंजना मंडलिक, श्रेयश मंडलिक, निषाद मंडलिक उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image