esakal | पारनेर कारागृहातील कैदी वापरत होते मोबाईल
sakal

बोलून बातमी शोधा

कैदी

पारनेर कारागृहातील कैदी वापरतात मोबाईल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पारनेर ः कारागृहात गंभीर गुन्ह्यांत अटक असलेल्या दोन आरोपींना, जेवण व भत्ता देणाऱ्या दोघांनी मोबाईल पुरविल्याची घटना उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांच्या कारागृह झडतीदरम्यान उघडकीस आली.

आरोपी सौरभ पोटघन व अविनाश कर्डिले, तसेच त्यांना मोबाईल पुरविणारे सुभाष लोंढे व प्रवीण देशमुख (रा. सुपे) यांच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सोमवारी (ता. 26) मध्यरात्री दीड वाजता पारनेर कारागृहाची अचानक झडती घेतली. तहसीलदार ज्योती देवरे व पारनेरचे पोलिस निरीक्षक घनश्‍याम बळप हेही उपस्थित होते. आरोपींची अंगझडती घेतली असता, खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सौरभ पोटघन, तसेच अविनाश कर्डिले यांच्याकडे मोबाईल आढळले.

पोलिस नाईक डमाळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सौरभ पोटघन (रा. जातेगाव, ता. पारनेर), अविनाश कर्डिले (रा. कुरुंद, ता. पारनेर), सुभाष लोढे व प्रवीण देशमुख दोघेही (रा. सुपे, ता. पारनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक बालाजी पदमणे तपास करीत आहेत.

बातमीदार - मार्तंड बुचुडे

loading image