धोंड्याच्या कार्यक्रमात जावयांचा वृक्षाची रोपे भेट देवुन सत्कार

अनिल चौधरी 
Tuesday, 6 October 2020

वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज ओळखुन आपले जीवन वृक्षमय करणार्या शिववाडी (ता. पारनेर) येथील सामाजिक कार्यकर्ते पोपट रसाळ या धेयवेड्या वृक्षमित्रांने यंदा धोंड्याच्या कार्यक्रमासाठी घरी आलेल्या जावयांना वृक्षाची रोपे भेट देऊन सत्कार केला.

निघोज (अहमदनगर) : वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज ओळखुन आपले जीवन वृक्षमय करणार्या शिववाडी (ता. पारनेर) येथील सामाजिक कार्यकर्ते पोपट रसाळ या धेयवेड्या वृक्षमित्रांने यंदा धोंड्याच्या कार्यक्रमासाठी घरी आलेल्या जावयांना वृक्षाची रोपे भेट देऊन सत्कार केला.

रसाळ कुटुंबियांनी केलेला हा वृक्षरुपी सत्कार तालुक्यात चर्चेचा विषय बनला असुन जावयांनीही आता या वृक्षाचे संगोपण करुन सासुरवाडीची आठवण कायमस्वरुपी जनत करण्याचा निर्णय घेतल्याने या ऊपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

आपल्या संस्कृतीत विशेषत: ग्रामीण भागात जावयांना घरी बोलावुन त्यांना गोडधोड जेवण करुन पाहुणचार करण्याची परपंरा आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या जावयांना धोंड्याच्या निमित्ताने खुश करतात. सध्या धोंड्याचा महीना चालू असुन करोनाच्या महासंकटाचे यावर यंदा सावट असले तरीही तीन वर्षातुन एकदा येणार्या या महीन्यात जावयांना खुश करण्याची व मानपान करण्यासाठी यंदाही कमी आधिक प्रमाणात जावयांचा पाहुणचार सुरु आहे. मात्र शिववाडी येथील रसाळ कुटुंबियाच्या वतीने पार पडलेला हा धोड्याचा कार्यक्रम समाजासाठी प्रेरणा देणारा ठरला आहे. वृद्ध आईचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने जावयांचा वृक्षरुपी सत्कार आणि सत्काररुपी वृक्षरोपांचे जावयांकडुन होणारे संगोपण व यातुन जपणारी सामाजिक बांधिलकी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
औरंगाबाद येथील खाजगी नोकरी करीत असताना शिववाडी येथील सामाजिक कार्यकर्ते पोपट रसाळ या वृक्षमित्राने औरंगाबाद येथील वाळुंज एम आय डी सी परीसरात मोठि वृक्ष बँक स्थापन केली आहे. वृक्षलागवड व त्याचे संगोपण करणे हे या ध्येयवेड्या तरुणाचा जीवनक्रम आहे. शिववाडी येथेहि मंदिर परिसरात व रस्त्याच्या कडेला वस्तीमधील तरूणांच्या सहकार्याने जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते वृक्षलागवड करीत ही झाडे जोपासली आहे.वृक्षलागवडीने ध्येयवेडा झालेल्या या तरुणाने यंदा धोंड्याच्या कार्यक्रमासाठी घरी येणार्या जावयांना ही वृक्षलागवडीचे महत्व पटवुन दिले आहे. त्यामुळे या जावयांनीही हा वृक्षरुपी सत्कार स्विकारत सासुरवाडीची आठवण कायमस्वरूपी जतन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

अण्णा हजारे यांची प्रेरणा....
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक बांधिलकीतुन मी गेल्या दहा वर्षापासून वृक्षलागवड चळवळ हाती घेतली. या चळवळीला अनेकांचा सहभागही लाभला. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रेरणेतुनच आम्हाला बळ मिळाले .त्यामुळेच एक मोठी वृक्षबँक स्थापन करु शकलो. आजचा हा उपक्रमही आण्णाच्या प्रेरणेमुळे हाती घेतला. याला कुटुंबिय व पाहुणे यांचीही साथ लाभली अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते पोपट रसाळ यांनी दिली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Innovative venture of Vrikshmitra Popat Rasal at Shivwadi