esakal | खबरदार! कर्ज वसुलीसाठी तगादा लावाल, तर... 
sakal

बोलून बातमी शोधा

Instructions to the police to take action only if there is a demand for recovery of debt

कोरोनाला रोखण्यासाठी मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केला. त्याचा फटका उद्योग- धंद्यांना बसला आहे. अनेक लहान मोठे उद्योग लॉकडाऊनच्या कालावधीत बंद होते. 

खबरदार! कर्ज वसुलीसाठी तगादा लावाल, तर... 

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहदनगर : कोरोनाला रोखण्यासाठी मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केला. त्याचा फटका उद्योग- धंद्यांना बसला आहे. अनेक लहान मोठे उद्योग लॉकडाऊनच्या कालावधीत बंद होते. जूनपासून यामध्ये शिथीलता आणली असली तरी पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरु झालेले नाही. अनेक लहान उद्योग हे बँकाचे कर्ज काढून चालवले जात आहेत.

मात्र, लॉकडाऊनमध्ये सध्या तोट्यात आहेत. पण सध्या काही बँका व फायनान्सने वसुलीसाठी तगादा लावला आहे. त्यामुळे अनेकजण ताणतणावात आहेत. यावर कोणी कर्जासाठी धमकावले तर पोलिस कारवाई करण्याचा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

मार्चपासून महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसांदिवस वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढत असून नागरिकांच्या मनात भिती आहे. त्यामुळे अनेकजण बाहेर पडत नाहीत. सध्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली असून हळूहळू सर्व सुरु होत आहे. मात्र तरीही उत्पदन हवे तसे मिळालेले नाही.
ग्रामीण भागात अनेक महिला समुह कर्ज घेतात. त्यातून छोटे- मोठे उद्योग चालवतात. काही गरजा भागवण्यासाठी कर्ज काढतात. त्यानंतर महिन्याला हप्ता देऊन कर्ज फेडतात. मात्र, येणाऱ्या पैशाची साधनेच बंद झाली आहेत. त्यामुळे कर्ज कसे द्यायचा हा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. त्यातच पैशासाठी तगादा लावला जात आहे.

राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नसल्याने अनेक लहान व्यवसायिक फायनान्सकडून कर्ज घेतात. किंका खासगी बँकाकडून कर्ज घेतात. अपवाद वगळता राष्ट्रीयकृत बँकांनाकडून पैशासाठी फोन येत नाहीत. मात्र, इतर ठिकाणाहून घेतलेल्या कर्जासाठी सध्या तगादा सुरु आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन कारवाईचा इशारा दिला आहे.
कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याकडे याबाबत मागणी आली होती. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना टॅग करुन ‘कर्जाच्या हप्त्यासाठी सवलत देऊनही काही खासगी वित्तीय संस्था वसुलीचा तगादा लावतायेत. त्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांकडून कर्जदारांना धमकावण्याचेही प्रकार होत असल्याने लोकांमध्ये त्यांच्याविषयी दहशत आहे.

याबाबत गृहमंत्री यांनी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिसांना टॅग करुन आपण सदर प्रकरणांत तातडीने लक्ष घालून नियमांनुसार योग्य ती कार्यवाही करावी असं सांगितले आहे. कर्जवसुलीच्या नावाखाली नागरिकांना धमकावणाऱ्यांवर पोलिस कठोर कारवाई करतील, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.