
अहिल्यानगर : शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात एक कोटी १० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भारतातील स्थानिक आरोपी परदेशातील गुन्हेगारांच्या मदतीने नागरिकांची फसवणूक करत असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.