esakal | हिरकणी आली मुलाखतीला, झोळीत ठेवून बाळाला!

बोलून बातमी शोधा

Interview given by a woman for the post of health worker in Pathardi
हिरकणी आली मुलाखतीला, झोळीत टाकून बाळाला!
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पाथर्डी ः तहसील कार्यालयासमोर एका बाजूला मोटारसायकल व दुसऱ्या बाजूला विजेचा खांबाचा आधार घेवून तिने झोका बांधला. सात महिन्यांची चिमुकली त्यामधे टाकली. स्वतःचा जिव झाडाला टांगून तिने पोटाची खळगी भरण्यासाठीची मुलाखत दिली. ही आरोग्य सेविका मुलाखतीला गेल्यानंतर तिचे पतीने चिमुकलीला झोका देत आईची भूमिका पार पाडली.

पाथर्डी तहसील कार्यालयात आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, कक्षप्रमुख, सफाई कामगार, ईसीजीतंत्रज्ञ, सोनोग्राफी तंत्रज्ञ आदी पदांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या. दैत्यनांदूर येथील सुमन दीपक वामन ही महिला पतीसह मुलाखतीसाठी आली होती.

हेही वाचा: शेवगावात घुले बंधू-ढाकणे उभारणार १५० बेडचे कोविड सेंटर

गर्दी झाल्याने व गरमास वाढल्याने बाळ रडू लागले. अखेर सुमन व तिचा पती कार्यालयाच्या आवारात गेले. तेथे एका बाजूला मोटारसायकच्या हॅंडलला व दुसऱ्या बाजूला विजेचा खांबाला झोका बांधला. झोक्‍यात चिमुकलीला झोपून सुमन मुलाखतीला गेली. पती दीपक यांनी मुलाखत होऊ पर्यंत आईची भूमिका बजावली.

बातमीदार - राजेंद्र सावंत