

श्रीरामपूर : जलसंपदा विभागाच्या हद्दीत झालेल्या अतिक्रमणावर कारवाईसाठी विभागाने पावले उचलली असून, श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याअंतर्गत उभारण्यात आलेल्या पोलिस मदत केंद्रालाही अतिक्रमणाची नोटीस बजावण्यात आली आहे. मार्च २०२५ मध्ये अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या हस्ते या केंद्राचा प्रारंभ करण्यात आला होता.