शिक्षकांच्या उशिरा पगाराचा प्रश्न सोडवणार, आमदार लंकेंनी घातले लक्ष

The issue of late salaries of teachers will be resolved, MLA Lanka said
The issue of late salaries of teachers will be resolved, MLA Lanka said
Updated on

पारनेर ः ""शिक्षकांचे पगार उशिरा होतात. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणार आहे.

केंद्रप्रमुखपदे पदोन्नतीने भरण्याबाबत व बदल्यांमध्ये पती-पत्नींबरोबरच एकल शिक्षकांवरही अन्याय होऊ नये यासाठी ग्रामविकासमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू,'' असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. 

पारनेर येथे गुरुमाऊली मंडळाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात लंके बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. लंके म्हणाले, ""शिक्षकांचे समाजासाठी मोठे योगदान आहे. त्यांनी संस्कारित पिढी घडविण्याचे काम चांगल्या पद्धतीने करावे.'' 

डॉ. तांबे म्हणाले, ""रावसाहेब रोहोकले यांच्याकडून शिक्षकांच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा कसा करावा हे शिकण्यासारखे आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांबाबत सतत पाठपुरावा करीत असतो. बदल्यांबाबत सर्वसमावेशक धोरण लागू करण्याकरिता आग्रही भूमिका घेऊ.'' 

रावसाहेब रोहोकले, संजय शेळके, सभापती काशिनाथ दाते, डॉ. बाळासाहेब बांडे, सुदाम पवार, मीनाक्षी तांबे, अविनाश निंभोरे, राजू इनामदार, स्वाती झावरे, वैजिनाथ गिते, अल्ताफ शहा यांचीही भाषणे झाली.

अर्चना गोजमगुंडे, विकास डावखरे, आर. पी. रहाणे, संजय शिंदे, राजेंद्र जायभाय, बाबा पवार, अशोक ढगे, भाऊ ढोकरे, गोरख देशमुख, संजय उदार, प्रवीण ठुबे, पोपट नवले, सचिन गाडीलकर उपस्थित होते. प्रवीण ठुबे यांनी प्रास्ताविक, राजेंद्र पोटे यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्वर इंगळे व सुनील दुधाडे यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com