esakal | पारनेरची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही, हे पवारसाहेबांच्या कानावर घालू...आमदार लंकेंचा शेतकऱ्यांना शब्द
sakal

बोलून बातमी शोधा

The issue of Parner's land will be told to Sharad Pawar

पारनेर येथे आज (ता.१०)रोजी वडगाव सावताळ, वनकुटे,
गाजदीपूर, ढवळपुरी यासंह अन्य गावांमधील नागरिकांनी  लंके यांची भेट घेऊन के.के.रेंज जमीन अधिग्रहणाबाबत चर्चा केली.

पारनेरची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही, हे पवारसाहेबांच्या कानावर घालू...आमदार लंकेंचा शेतकऱ्यांना शब्द

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर ः पूर्वी वडगाव सावताळ,
वनकुटे,गाजदीपूर यासंह परीसरातील अन्य गावे 
जिरायत भाग होता. मात्र, आता यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत शेतक-यांनी कष्टाने आपले क्षेत्र बागायत केले आहे. यामुळे आर्थिक सुबत्ता आली आहे. आता एक इंचही जमीन शेतकरी देणार नाहीत. यासाठी आपण लढा देऊ. के.के.रेंज जमीन अधिग्रहण न करणेबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच आपल्याला मदत करू शकतात. पुढील आठवडय़ात त्यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिले.

पारनेर येथे आज (ता.१०)रोजी वडगाव सावताळ,वनकुटे,
गाजदीपूर,ढवळपुरी यासंह अन्य गावांमधील नागरिकांनी 
लंके यांची भेट घेऊन के.के.रेंज जमीन अधिग्रहणाबाबत चर्चा केली.

हेही वाचा -  श्रीगोंद्यात फोडाफोडीचे राजकारण जोरात

यावेळी येथील नागरिकांनी आम्हाला मोबदल्याचे आमिषही दाखविले जाईल. रक्कम वाढवुन देतो असेही म्हणले जाईल. मात्र, आम्हाला यातील काहीच नको आहे. आम्हाला आमची जमीनच हवी आहे. तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही तुमच्या मागे आहोत. 

लंके यांनीही ग्रामस्थांना धीर देत सैन्य दलातील अधिकारी कोणी दुसरे नाहीत, तीही माणसंच आहेत. जमीन अधिग्रहण करायची आहे, तर तिकडे राजस्थानमधील करा. आमच्या शेतक-याने कष्टाने तयार केलेल्या जमिनीला त्रास देऊ नका. जमीन अधिग्रहण न करण्यासाठी जे काही करता येईल ते करणार आहे. या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. कागपत्रासहींत पवार यांची पुढील आठवडय़ात भेट घेणार आहे. यावेळी तीनही तालुक्यातील शिष्टमंडळ बरोबर असेल व संरक्षण मंत्र्यांची ही भेट घेऊ, असेही ते म्हणाले.

संपादन - अशोक निंबाळकर