देशाची सेवा करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य

राजू घुगरे
Saturday, 26 December 2020

देशाची सेवा करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. सैन्यदलात जावून देशसेवेची संधी मिळणे ही अभिमानाची व गौरवाची बाब आहे.

अमरापूर (अहमदनगर) : देशाची सेवा करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. सैन्यदलात जावून देशसेवेची संधी मिळणे ही अभिमानाची व गौरवाची बाब आहे. तरुणांनी स्वत:च्या करीअर बरोबरच कुटूंब, गाव आणि राष्ट्र यांच्या विकासासाठी पुढे आले पाहीजे, असे प्रतिपादन सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा यांनी केले. 

श्रीक्षेत्र वरूर बुद्रुक (ता. शेवगाव) येथे अभिनव फाऊंडेशनच्या वतीने सैन्य दलामध्ये निवड झालेल्या तरुणांचा व कोरोना योध्दयांचा सन्मान, वक्तृत्व स्पर्धेचा पारीतोषीक वितरण समारंभ व रक्तदान शिबीराचे आयोजन प्रसंगी पावरा बोलत होते. यावेळी माजी प्राचार्य दिलीप फलके, किसन माने, माजी सरपंच विष्णू म्हस्के, मेजर अन्वर शेख, भगुरचे सरपंच वैभव पुरनाळे, उपसरपंच गोपाळ खांबट आदी प्रमुख उपस्थित होते. 

यावेळी सैन्यदलात भरती झालेले गावातील योगेश म्हस्के, सचिन गावडे, महेश दळे, अमोल केदार, सोमनाथ लाड, नितीन मिसाळ यांचा तर कोरोना काळात विशेष योगदान देणाऱ्या सुनील काकडे, डॉ. राजेंद्र कोठुळे, डॉ. गजेंद्र खांबट, डॉ. सूर्यकांत पिसे, सुनिता चव्हाण, ज्योती तुजारे, मिनाताई उभेदळ, निलेश मोरे यांचा स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. तर शाळा बंद काळात विदयार्थ्यांना वाचन पेरणा मिळावी म्हणून आयोजीत केलेल्या आँनलाईन वकृत्व स्पर्धेतील कार्तिक म्हस्के, तुषार शिंदे, गिता म्हस्के या विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषीक प्रदान करण्यात आले. तसेच शिष्यवृत्त परीक्षेत जिल्हा गुमवत्ता यादीत निवड झालेल्या शुभम पाचरणे व कृष्णा देशमुख यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अभिनव फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविराज फलके, श्रीकांत मुरदारे, संदीप दरवडे, राजेंद्र नागरगोजे, मनोहर कर्डीले, अक्षय डांगरे, आबासाहेब बेडके, आत्माराम म्हस्के, प्रविण म्हस्के, ज्ञानेश्वर म्हस्के, गणेश मोरे, हमिद शेख आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन म्हस्के यांनी तर सुत्रसंचान निलेश मोरे यांनी केले. तर भाऊसाहेब पाचरणे यांनी आभार मानले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is the duty of every citizen to serve the country