
सोशल मीडियामुळे विकास झालेल्या गावांचे व्हिडीओ पाहून तरुणाई प्रभावीत झाली आहे. आपल्याही गावात असा विकास व्हावा, हा दृष्टीकोन ठेऊन तरुणाई राजकाणात येऊ पाहत आहे. मात्र, त्यांना गावगाड्यात लक्ष घालू दिले जात नसल्याचे चित्र आहे.
अहमदनगर : गावपातळीवर राजकारणात उतरण्यासाठी तरुणाई सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यांना मतदारांकडून चांगला पाठिंबाही मिळत आहे. मात्र, प्रस्थापित राजकीय नेते एकजूट करत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. यातूनच पॅनेल तयार करण्यासाठी जवळच्या नातेाईकांची मनधरणी केली जात आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकारण तापले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक गावात तरुणाई राजकारणात येण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना रोखण्यासाठी प्रस्थापितांच्या नाकीनऊ आले आहेत.
सुशिक्षीत तरुण राजकारणात येत असल्याने मतदारांचा त्यांना पाठिंबाही मिळत आहे. पण ते राजकारणात आले तर जुन्यांना संधी मिळणार नाही, त्यामुळे राजकीय खेळ्या करुन त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियामुळे विकास झालेल्या गावांचे व्हिडीओ पाहून तरुणाई प्रभावीत झाली आहे. आपल्याही गावात असा विकास व्हावा, हा दृष्टीकोन ठेऊन तरुणाई राजकाणात येऊ पाहत आहे. मात्र, त्यांना गावगाड्यात लक्ष घालू दिले जात नसल्याचे चित्र आहे.
अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तरुणांनी निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त केली तरी वाद नको म्हणून घरातील व्यक्ती त्यांना परवानगी देत नाहीत. यातूनही काहीजण पुढे आले आहेत. मात्र त्यांना रोखण्यासाठी त्यांच्याच नातवाईकांडून प्रयत्न केला जात असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी प्रस्थापीतांना डवलून विकासाचा ध्यास घेऊन तरुण राजकारणात उतरले आहेत. त्यांना रोखण्यासाठी गावातील सर्व सत्ताधारी व विरोधक एक आले असल्याचीही उदाहरणे आहेत. त्यातूनच राजकीय चाल खेळत त्याच्याच जवळच्या नातेवाईकांना निवडणूक रिंगणात उतरवले जात आहे.
ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
जुने कसूर काढण्याचा प्रयत्न
ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणाई सक्रीय होताना दिसत आहे. मात्र, त्यांच्या लक्षात नसलेलेही जुने प्रसंगाची आठवण काढून राजकीय कसूर काढले जात आहेत. पूर्वीच्या निवडणुकीत तुझं घर माझ्या मागे नव्हते चालले मग आम्हीही तुझ्या विरोधातच काम करणार असं उमदवारांना म्हटलं जात आहे. तर काही ठिकाणी ‘त्याच’ अन् माझं जमत नाही त्याला उमेदवारी दिली म्हणून तु आमच्यात नको असं म्हणून जुने कसुर राजकारणाच्या माध्यमातून काढले जात आहेत.