जलयुक्तच्या कामामुळे नक्कीच हरितक्रांती होईल : डॉ. सुजय विखे पाटील

Jalpujan of Zilla Parishad lake at Torkadwadi in Karjat taluka
Jalpujan of Zilla Parishad lake at Torkadwadi in Karjat taluka

कर्जत (अहमदनगर) : तालुक्यातील साठवण बंधारे व जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून साठलेले पाणी शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे. यामुळे निश्चितच जलक्रांती होऊन हरितक्रांती होईल, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. 

कर्जत तालुक्यातील तोरकडवाडी येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या व पूर्ण क्षमतेने भरलेल्या साठवण बंधाऱ्यातील जलपूजन खासदार डॉ. विखे पाटील यांचे हस्ते झाले.

डॉ. विखे म्हणाले, यावर्षी कर्जत तालुक्यातील सर्व भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे साठवण बंधारे व जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. या पाणी साठयामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. आगामी काळात जिथे गरज आहे तिथे मी खंबीरपणे पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही मी देतो.

खासदार डॉ. विखे पाटील यांनी तालुक्यातील जलालपुर, राक्षसवाडी, तोरकडवाडी, राशिन, कर्जत शहर, चांदे, घुमरी या गावांचा दौरा केला. तेथे त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधित अडचणी समजून घेतल्या. तसेच काही अडचणींचे संबंधितांशी संपर्क करीत सोडविल्या. तसेच राक्षसवाडी येथे त्यांचे हस्ते कलशारोहन सोहळा झाला. 

कर्जत शहरातील जिल्हा उपरुग्णालयात स्वच्छ सर्व्हेक्षण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हाउपाध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, युवक नेते दादासाहेब सोनमाळी, रामदास हजारे, गणेश क्षीरसागर, प्रांतअधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, मुख्याधिकारी गोविंद जाधव, पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड उपस्थित होते. 

वडील माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियानात शिर्डी नगरपंचायत सलग दोन वर्षे राज्यात प्रथम आली. लोणी ग्रामपंचायत दुसरी आली. आईच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायती अव्वल राहिल्या. सर्वांचेच काम अत्यंत चांगले असल्याने आता माझ्या कार्यक्षेत्रातील कर्जत नगरपंचायत ही यश मिळविल यात शंकाच नाही, असेही खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com