esakal | शिरसगावमध्ये नळजोडणी सुरु! १३ कोटीच्या निधीतून जलस्वराज योजना
sakal

बोलून बातमी शोधा

Jalswarajya scheme from a fund of 13 crore

शिरसगाव येथे 13 कोटींच्या निधीतुन जलस्वराज दोन पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आली.

शिरसगावमध्ये नळजोडणी सुरु! १३ कोटीच्या निधीतून जलस्वराज योजना

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्‍यातील शिरसगाव येथे 13 कोटींच्या निधीतुन जलस्वराज दोन पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आली. स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते नळजोडणीस नुकताच प्रारंभ करण्यात आला.

सरपंच आबासाहेब गवारे, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी पाणी साठवण प्रकल्पाची पहाणी करुन आढावा घेतला. प्रकल्पासाठी तलावात प्रवरा डावा तट कालव्यातून पाणी उपलब्ध होणार आहे. 

जलस्वराज दोन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यावर गावठाण प्रवेशद्वार, प्रगतीनगर, इंदिरानगर, जयमल्हार नगर, कारवाडी, जाधववस्ती, उपाध्ये मळा, गवारे वस्ती परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सरपंच गवारे यांनी सांगितले. योजनेद्वारे शिरसगाव ग्रामस्थांना मीटरद्वारे पाणी मिळणार असल्याची माहिती शाखा अभियंता एस. जे. गायकवाड, प्रवीण गवारे यांनी दिली. उपसरपंच आकाश मैड, दत्तात्रेय गवारे, बबन गवारे, योगेश बोरुडे, शिवाजी गवारे उपस्थित होते. 

रस्त्यावर अतिक्रमण हटाव मोहीम 
श्रीरामपूर :
सुधारीत रस्ते ग्रामीण भागातील विकासाचा मार्ग आहेत. परंतू तालुक्‍यातील अनेक रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी महसुल प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

विविध रस्त्यांवरील अतिक्रमण धारकांनी तातडीने समोर येवून अतिक्रमण काढण्याच्या सुचना तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिल्या. महसुलकडुन तालुक्‍यातील टाकळीभान परिसरातील शिवर स्त्यावरील अतिक्रमण नुकतेच हटविण्यात आले. मंडलाधिकारी जनार्दन आहोळ, तलाठी आकांक्षा ढोके यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी कारेगाव ते टाकळीभान आणि खिर्डी ते गुजरवाडी रस्त्यावरील अतिक्रमण काढुन रस्ता मोकळा केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image