
नगर ः कोरोनाबाधितांमुळे जामखेड राज्यात चर्चेत आले होते. परदेशी कोरोना बाधित नागरिक शहरात तब्बल दहा दिवस राहिले. 26 मार्चला ते उघडकीस आले. तोपर्यंत त्यांनी 'कोरोना'चा वानोळा जामखेडला दिला होता. या दोघांसह टप्प्याटप्याने 17 जण कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. यामध्ये उर्वरित सर्वच्या सर्व 15 जण स्थानिक कोरोनाबाधित होते.
या 15 कोरोनाबाधित नागरिकांपैकी 13 जण मागील आठवड्यात कोरोनामुक्त झाले आहेत. तर एका वयोवृध्द व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पंधराव्या रूग्णांवर नगरमध्ये उपचार सुरू होते. शनिवारी ता. 16 मे रोजी त्या रूग्णांचे 21 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आज रविवारी 17 मे रोजी त्या कोरोनामुक्त रूग्णांला डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळे जामखडेकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे!
हेही वाचा - औरंगाबादचे कोरोनाबाधित दारूसाठी नेवाशात
जामखेडसह तालुक्यातील सर्वांवर शासनाने दिलेल्या सर्व सुचनांचे काटेकोर पालन आणि अंमलबजावणी करून कोरोना विरोधी लढाईत मात करुयात. या करिता आजपासून शहरासह तालुक्यात एकही रूग्ण आढळून यायला नको. जामखेड तालुक्यातील समस्त जनतेने दाखवलेले धैर्य, संयम दाखवला. प्रशासनाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेल्या खडतर मेहनतीमुळेच जामखेड शहर कोरोनामुक्त होऊ शकले आहे.
तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, गटविकास अधिकारी पी.पी.चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक निलेश कांबळे, अवतारसिंग चव्हाण, मुख्याधिकारी सुहास जगताप, तालुका अरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे, डॉ. युवराज खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनामुक्त करण्यासाठी दिवस-रात्र लढलेल्या सर्व'अधिकारी - कर्मचारी या कोरोना वाॅरियर्सचे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
जामखेडकरांसमोर ही आहेत आव्हाने
१-जामखेड कोरोनामुक्त झाल्याने तालुक्यातून इतरत्र रोजगाराच्या व नोकरीच्या निमित्ताने स्थलांतरित झालेले चाकरमाने मुंबई-पुणे, औरंगाबाद व राज्याच्या विविध भागातून तालुक्याच्या दिशेने येऊ लागले आहेत. तर काही येण्याच्या मार्गावर आहेत. या आलेल्या सर्वांना 14 दिवस सक्तीचे कोरोंटाईन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात या व्यक्तींना कोरोटाईन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा विलगिकरण कक्ष म्हणून वापराव्यात, अशा सूचना प्रशासनाकडून ग्राम सुरक्षा समितीला प्राप्त झालेल्या आहेत. मात्र शाळा गावाच्या मध्यवर्ती व रहदारीच्या ठिकाणी असल्याने त्या वापरणे कितपत योग्य हा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झालेला आहे. गाव पातळीवरील ग्रामसुरक्षा समितीला अधिकार अधिकचे असले तरी त्यांचा धाक येणाऱ्याला राहीलच याचा नेम नाही, त्यामुळे पोलीस प्रशासनाची अधिक मदत ग्रामीण भागात आवश्यक राहणार आहे.
2* लॉक डाऊनच्या काळात जामखेड हॉटस्पॉट होतं म्हणून ग्रामीण भागातील सर्व रस्ते जामखेडकडे जाणारे निर्मनुष्य झाले होते. मात्र, जामखेडचे हाँटस्पॉट कमी झाल्याने पुन्हा ग्रामीण भागातले रस्ते पूर्ववत वाहू नाहीत. अत्यावश्यक सेवेव्यतीरिक्त व्यक्ती घराच्या बाहेर पडणार नाहीत, याची काळजी यापुढेही प्रशासनाला घ्यावीच लागणार आहे.
3* व्यक्तींची अधिक गर्दी होणारे काही व्यवसाय आणखी काही दिवस सुरू होऊ नयेत, यासाठीही प्रशासनाला तालुकास्तरावर स्वतःची नियमावली तयार करावी लागणार आहे .
4*काही अटींचे बंधन घालून दिल्या जाणाऱ्या कौटुंबिक सोहळ्याच्या परवानग्या तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.
5 गेली काही दिवसापासून बंद असलेले धार्मिक तीर्थस्थळ यापुढील काही काळात अशीच बंद ठेवावी लागणार आहेत.
6.परवानाच्या नावावर अत्यावश्यक सेवा हे फलक लावून वहातुकीच्या व्यावसायात काम करणाऱ्या तालुक्यातील व्यक्ती तालुक्याबाहेर प्रवासासाठी जा-ये करतात, यामध्ये ग्रामीण भागातील ट्रक,टेम्पो धारकांचा समावेश आहे.त्यांच्या वर वेळीच निर्बंध घालणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.