

Crackdown in Jamkhed: Three Arrested in Firing Case
Sakal
अहिल्यानगर : जामखेड शहरातील कान्होपात्रानगर येथे हॉटेलचालकावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.