esakal | Video : अवघा तालुका होणार जामखेड, खर्ड्यात क्वारंटाइन
sakal

बोलून बातमी शोधा

Home quarantine in jamkhed

तालुक्‍यातील तीvन प्रमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांच्या इमारती शासनाने ताब्यात घेतल्या असून, तेथे गावनिहाय विभागणी करून क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या गावांची यादी तहसीलदार नाईकवाडे यांनी प्रसिद्ध केली आहे

Video : अवघा तालुका होणार जामखेड, खर्ड्यात क्वारंटाइन

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून तालुक्‍यात येणाऱ्यांना क्वारंटाईन करण्यासाठी जामखेड व खर्डा ही दोन ठिकाणे प्रशासनाने निश्‍चित केली आहेत. 
"सकाळ', सरकारनामा आणि ई-सकाळच्या माध्यमातून प्रशासनाला काही उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यांची दखल घेऊन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी प्रस्ताव हाती घेतला. या संदर्भात प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत बैठक होऊन सकारात्मक निर्णय झाला. मात्र, येथे येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन केल्यानंतर सुविधांची अडचण होती. आमदार रोहित पवार यांनी या अडचणींवर मात करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका घेतली. त्यातूनच जामखेड तालुक्‍यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी क्वारंटाईन करण्याऐवजी जामखेड व खर्डा येथेच क्वारंटाईन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. 

हेही वाचा - कोरोना लागला राशीनकरांच्या मागे

तालुक्‍यातील तीन प्रमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांच्या इमारती शासनाने ताब्यात घेतल्या असून, तेथे गावनिहाय विभागणी करून क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या गावांची यादी तहसीलदार नाईकवाडे यांनी प्रसिद्ध केली आहे. जामखेड, खर्डा येथे क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी लागणाऱ्या सुविधा पुरविण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्याकडून मदत करण्यात येणार आहे. हे तिन्ही विलगीकरण कक्ष आजपासून सुरू झाले आहेत, असे नाईकवाडे यांनी सांगितले.

क्वारंटाईन कक्ष आणि त्यात समाविष्ट गावे 
ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड ः जामखेड, धोत्री, बटेवाडी, चुंबळी, जमादारवाडी, मोहा, भुतवडा, लेनेवाडी, जामवाडी, साकत, कोल्हेवाडी, पिंपळवाडी, शिरूर, सावरगाव, पाडळी, खुरदैठण, कुसडगाव, सरदवाडी, रत्नापूर, सारोळा, काटेवाडी.

नागेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड ः आरणगाव, पारेवाडी, डोणगाव, पिंपरखेड, हसनाबाद, कवडगाव, गिरवली, पाटोदा, खामगाव, भवरवाडी, सांगवी, खांडवी, बावी, डिसलेवाडी, धोंडपारगाव, राजेवाडी, फक्राबाद, धानोरा, वंजारवाडी, हळगाव, चौंडी, आघी, मतेवाडी, नान्नज, घोडेगाव, चोभेवाडी, पोतेवाडी, बोर्ले, मुंजेवाडी, जवळा, महारुळी, वाघा, गुरेवाडी, राजुरी, डोळेवाडी. 

न्यू इंग्लिश स्कूल, खर्डा ः खर्डा, मोहरी, नागोबाची वाडी, मुंगेवाडी, दिघोळ, माळेवाडी, जातेगाव, तरडगाव, वंजारवाडी, सातेफळ, दौंडाची वाडी, सोनेगाव, धनेगाव, जवळके, नायगाव, नाहुली, देवदैठण, धामणगाव, पिंपळगाव (आळवा), आपटी, बांधखडक, पांढरेवाडी, दरडवाडी, लोणी, आनंदवाडी, वाकी, बाळगव्हाण, तेलंगशी, जायभायवाडी, पिंपळगाव (उंडा).